आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबीने सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव अभिनीत ‘खो गए हम कहां’ची केली घोषणा! (Excel Entertainment and Tiger Baby announce ‘Kho Gaye Hum Kahan’ starring Siddhant Chaturvedi, Ananya Pandey and Adarsh Gaurav)

तरुण, ताजी आणि प्रासंगिक, ‘खो गए हम कहां’ मुंबई शहरातील तीन मित्रांची ‘डिजिटल’ कहाणी आहे. याची पटकथा झोया अख्तर, अर्जुन वरैन सिंह, रीमा कागती यांनी लिहिली असून झोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तरुण आणि प्रतिभाशाली अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्या मुख्य भूमिका असून अर्जुन वरैन सिंह याचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असणार आहे.

झोया अख्तरच्या ‘गली बॉय’च्या तुफान यशानंतर सिद्धांतचे (एमसी शेर) नाव घराघरात पोहोचले असून त्याला आता अनन्या सोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला चाहते उत्सुक आहेत. आदर्शला देखील यां दोघांसोबत एकत्र पाहणे, आनंददायक असणार आहे, त्याचे ‘द व्हाइट टाइगर’मधल्या अभिनयासाठी खूप कौतुक झाले होते.

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबी यांनी आज आपला आगामी थिएट्रिकल प्रोजेक्ट, ‘खो गए हम कहाँ’ची घोषणा करत पोस्टर आणि व्हिडीओचे अनावरण केले. चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.