अनुराग कश्यप आपला आणखी एक बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दोबारा’ सोबत प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे, जिने कश्यप सोबत अनेक वेळा काम केले आहे.
महत्त्वाची गोष्ट ही आहे कि, तापसी पुन्हा एकदा पवैल गुलाटी सोबत दिसणार आहे, ज्यांनी समीक्षकांद्वारा प्रशंसित ‘थप्पड़’मध्ये अभिनेत्रीसोबत काम केले आहे जी मागील वर्षी रिलीज़ झाली होती. चित्रपटाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी आणि प्रतिभाशाली अभिनेत्यासोबत आपल्या रीयूनियनची घोषणा करताना, तापसीने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीने ‘दोबारा’च्या सेटवरून पवैल सोबत एक कैंडिड फोटो शेअर करताना लिहिले, “My last of the #Dobaaraa Series Coz some collaborations deserve to be repeated. Since this man had some unfinished business in Thappad so this is a chance to mend his mistake @pavailgulati
Today exactly after ONE YEAR of #Thappad I can only hope he doesn’t lose the woman #Dobaaraa
P.S- let’s see in which parallel universe we were meant to be.”
या दोघांना त्यांच्या मागील चित्रपटासाठी खूप नावाजले गेले आहे, यातच चित्रपट “दोबारा” मधील रीयूनियन हे निश्चितच उत्साहवर्धक आहे.
‘दोबारा’ अनुराग कश्यप दिग्दर्शित असून एकता कपूर यांची कल्ट मूवीज़ आणि सुनीर खेतरपाल यांच्या एथेना द्वारा संयुक्त निर्मिती आहे.