अभिनय सम्राट दिलीप कुमार यांनी या जगाचा आज कायमचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्यावर आज सर्व शासकीय सन्मानात जुहू कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (Dilip Kumar laid to rest with full state honours at Juhu Qabrastan)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अनिल कपूर, शाहरुख खान, रणबीर कपूर, विद्या बालन सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी आज त्यांच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले. शाहरुख खान आणि इतर स्टार्स सायरा बानोचे सांत्वन करीत होते. त्यांचे पार्थिव शरीर भारतीय तिरंगामध्ये गुंडाळलेले होते. त्यानंतर त्यांना मुंबईच्या सांताक्रूझ मधील जुहू कब्रस्तान येथे नेण्यात आले.  जुहू कब्रस्तान येथे त्यांचे चाहते हजारोंच्या संख्येने त्यांना निरोप देण्यास जमले होते.

dilip kumar last rites

दिलीप कुमार यांच्या अंतिम संस्कारासाठी स्वतः पत्नी सायरा बानो उपस्थित होत्या. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईही त्यांच्यासोबत दिसले. दिलीप कुमार यांच्या अंत्यसंस्कारात सुपरस्टार अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेकसह पोहोचले होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर चाहते आणि चित्रपटसृष्टीत शोकाची लाट उसळली आहे.

दिलीप कुमार यांचे आज सकाळी 7.30 वाजता निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

हेही वाचा- दिलीप कुमार … अभिनयाचा अखेरचा मुगल सम्राट गेला…

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.