धर्मा प्रॉडक्शनचा आता कॉर्नरस्टोन सोबत प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश!

टॅलेंट मॅनेजमेंट अर्थातच प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात धर्मा प्रॉडक्शनने आता नव्याने पाऊल टाकले आहे. या क्षेत्रात गेल्या दशकांपासून कार्यरत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीसोबत भागीदारी करून आता ‘धर्मा-कॉर्नरस्टोन एजन्सी’ या नावाने आता नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे जी अभिनय आणि संगीत क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता व त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असेल. धर्मा प्रॉडक्शनला सिनेमा निर्मिती क्षेत्रात ४० वर्षांचा अनुभव पाठीशी असल्याने या क्षेत्रात करिअर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.  

गेल्या काही वर्षांमध्ये धर्मा प्रॉडक्शनने विविध कलाकारांना आपल्या सिनेमातून संधी देत आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहेच. या क्षेत्रात उत्कटतेने, कौशल्याने आणि कठोर परिश्रम करणाऱ्या असंख्य कलाकारांसाठी त्यांनी व्यासपीठ तर उभारलेच आहे शिवाय त्यांना एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. 

बंटी सजदेह यांची कॉर्नरस्टोन ही कंपनी एका दशकापासून कौशल्य व प्रतिभा व्यवस्थापनामध्ये काम करीत आहे. पारंपारिक आणि डिजिटल विक्री आणि विपणन ते परवाना, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग, पीआर आणि एकंदर प्रतिमा व्यवस्थापन या सर्व प्रकारच्या ब्रँड बिल्डिंग कौशल्यामुळे कॉर्नरस्टोनने बर्‍याच आघाडीच्या क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभांना यशस्वीरित्या ओळख मिळवून दिली आहे. 

धर्मा प्रोडक्शन्स आणि कॉर्नरस्टोनच्या चा हा वारसा लक्षात घेता, धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए) ही अनुभवी व्यावसायिकता, रोमांचक आणि समकालीन प्रतिभा आणि लोकप्रिय संस्कृतीच्या या युगात चित्रपट, जाहिराती, ओटीटी, व कार्यक्रमांद्वारे एक मोठे टॅलेंट पावर हाऊस बनवायचे उद्दिष्ट साध्य करेल. अनेक प्रतिभावान कलाकारांना एकत्र करून त्यांचे करियर बनविणे, त्यांना नावलैकिक प्राप्त करून देणे व त्यांच्यात परिपक्वता आणणे हे या एजन्सीचे मुख्य ध्येय असणार आहे. 

(Press Release)

Website | + posts

Leave a comment