आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पादुकोणने आज आपल्या लाइफस्टाईल ब्रँडची स्थापना करत असल्याची घोषणा केली असून लवकरच त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. (Deepika Padukone to launch global lifestyle brand for ‘Beauty and Skin Care’!) या ब्रँडची पहिली श्रेणी सौंदर्य आणि त्वचेच्या देखभाल उत्पादनांवर केंद्रित असून ही श्रेणी खासकरून भारतात रुजलेली आणि विज्ञानाधीष्ठीत असेल.

दीपिका पादुकोणला 2018 मध्ये टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नामांकित केले होते. 2018 आणि 2021 मध्ये, त्यांनी वैरिएटीच्या ‘इंटरनॅशनल वुमेन्स इम्पॅक्ट रिपोर्ट’ मध्ये फिचर करण्यात आले होते, जे जगभरातील मनोरंजनात महिलांच्या कामगिरीला अधोरेखित करते. सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या ब्रँड्सपैकी एक असलेल्या दीपिकाकडे 100 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांचा विशाल डिजिटल फुटप्रिंट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

आपल्या या ब्रँडविषयी बोलताना दीपिका म्हणाली की, “माझा असा विश्वास आहे की भारताची स्थिती नेहमीच अद्वितीय राहिली आहे. उर्वरित जगापर्यंत आपली प्रचंड पोहोच आहे, आपला देश मूल्य, संस्कृती आणि समृद्ध वारसा लाभलेला आहे; ज्याचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे. म्हणून आमचा प्रयत्न एक असा ब्रँड तयार करण्याचा आहे ज्याची मुळे भारतात असली, तरीही जागतिक पातळीवर पोहोचलेली असतील आणि त्याला एक वैश्विक अपील असेल.”

हा ब्रँड 2022 पासून उपलब्ध होण्याची आशा आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment