आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

“Bebhaan” marathi movie trailer launched. रोमान्स आणि अॅक्शनचा पुरेपूर मसाला *बेभान” या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. अनुपसिंग ठाकूर, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे असा प्रेमत्रिकोण असलेला “बेभान” ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. “बेभान” चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. शशिकांत पवार प्रोडकशनच्या अंतर्गत मधुकर (अण्णा)देशपांडे रायगावकर आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येत आहेत.

दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेल्या बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी जबाबदारी निभावली आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनुपसिंग ठाकूर मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंगनं बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

श्रीमंत पार्श्वभूमी असलेला नायक आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दोन तरुणी, त्यांच्यामुळे नायकात होणारा बदल हे बेभान चित्रपटाचं कथासूत्र आहे. अॅक्शन, रोमान्स असलेल्या कथेत उत्तम अभिनेते, उत्कृष्ट तांत्रिक बाजू, श्रवणीय संगीत यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे एक दमदार आणि बेभान कथानकाचा आनंद मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी ११ नोव्हेंबरची वाट पाहायला हवी.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.