काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा तरुण नक्की कोण आहे? असा प्रश्न रसिकांना पोस्टर पाहून पडला होता. आता मात्र प्रेक्षकांची उत्सुकता फार न खेचता या तरुणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन ‘बाबू’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये अतिशय रावडी अंदाजात दिसणारा अंकित भाव खाऊन जात आहे. अंकितच्या या लूकने अभिनेत्याबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता तर कमी केली, मात्र त्याचा हा लुक पाहून आता सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अंकित हा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. त्याने यापूर्वी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय अंकित हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता आहे.

babu film muhurat

नुकताच या सिनेमाचा मुहूर्त मुंबईमध्ये संपन्न झाला. यावेळी या सिनेमातील अंकितच्या लूकचे नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले. या मुहुर्तावेळी गायत्री दातार, रुचिरा जाधव, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे, निर्माता बाबू के. भोईर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती.

Website | + posts

Leave a comment