आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Baahubali The Conclusion’ is now in Marathi on Shemaroo Marathi Bana Channel. दिवाळीचं औचित्य साधून शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीने बाहुबली या महाचित्रपटाचा पहिला भाग मराठी भाषेमध्ये प्रदर्शित केला. एक अजरामर कलाकृती आपल्याला अत्यंत जवळच्या वाटणाऱ्या कलाकारांच्या आवाजात आपल्या भाषेत अनुभवता आल्याने प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून दाद दिली. प्रेक्षकांच्या पसंतीला कौल देत ‘शेमारु मराठीबाणा’ ’बाहुबली: द कन्क्ल्युजन’ रविवारी १३ मार्च रोजी घेऊन येत आहे.

डॉ.अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, संस्कृती बालगुडे, उदय सबनीस यांनी आपल्या आवाजांनी बाहुबली मधल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा मराठी भाषेत पुनरुज्जीवित केल्या आहेत. बाहुबली मराठी ची प्रवीण तरडे यांनी क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून जबादारी पार पाडली आहे. तर लिखाण स्नेहल तरडे यांनी केले आहे.

मुळातच यशस्वी ठरलेलं बाहुबली मराठी चित्रपटाचं संगीत, त्यातल्या एकेका भावनेला ,शब्दाला न्याय देत मराठमोळं करण्याचं अवघड काम कौशल इनामदार यांनी लीलया पार पाडलं आहे. वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे या गीतकारांची त्यांना सोबत मिळाली आहे. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, बेला शेंडे, यांसारख्या दिग्गज गायकांनी ही गाणी स्वरबद्ध केली आहेत. केवळ शब्दशः गाणी नाही तर समग्र अनुभव मराठी भाषेत सादर करण्याचा यशस्वी प्रयोग या टीम ने केला आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे चित्रपट केवळ अनुवादित न वाटता अस्सल मराठी मातीतला भासतो. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.