अभिनेता रणबीर कपूर प्रथमच अनिल कपूर, परिणीती चोप्रा आणि बॉबी देओल यांच्यासमवेत एकत्र पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामध्ये हे सर्व एकत्र येणार आहे. २०२१ नववर्षाच्या पूर्वसंध्येवर अभिनेता अनिल कपूरने सोशल मीडियावर अधिकृतपणे चित्रपटाची घोषणा केली.

 
याबद्दलचे ट्विट करतांना अनिल कपूर म्हणतो- “Oh boy! The new year just gets better with this whistle! Presenting, #Animal, can’t wait for our journey to begin.”

या टीझरमध्ये रणबीर कपूर वडील व मुलाच्या नात्याविषयी बोलताना ऐकू येतो व शेवटी गोळीबाराचा आवाज येत असल्याने या टीझरने सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरने हा चित्रपट बराच आधी साईन केला होता तर अनिल कपूरने गेल्या आठवड्यात यासाठी होकार कळविला आहे. दरम्यान, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाचा शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत ‘कबीर सिंह’ हा शेवटचा चित्रपट प्रचंड गाजला असल्याने रसिक प्रेक्षक ‘अ‍ॅनिमल’ बद्दल खूप उत्सुक आहेत.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.