भारतातील संपन्न सांस्कृतिक वारसा जगातील 240 देश आणि प्रदेशांपर्यंत नेण्याच्या दिशेने

प्राइम व्हिडीओचे आणखी एक पाऊल

मुंबई, 17 मार्च 2021: भारतातील कार्यचलनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून अमेझॉन प्राइम व्हिडीओने आगामी राम सेतू या सिनेमासाठी केप ऑफ गुड फिल्म्स, अबडेंशिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रोडक्शन यांच्यासोबत सहनिर्मिती करत असल्याची घोषणा केली आहे. या सिनेमातून खोलवर रुजलेली भारतीय संस्कृतीची मुळे आणि ऐतिहासिक वारसा समोर आणला जाणार आहे. हा सिनेमा ऍक्शन ऍडव्हेंचर ड्रामा असून या सिनेमात अक्षय कुमार सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा असे दमदार कलाकार असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर राम सेतू भारतातील तसेच 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील प्राइम मेंबर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार म्हणाला, “राम सेतूच्या कथेने मला नेहमीच अचंबित केले आहे, प्रेरणा दिली आहे. यातून धैर्य, साहस आणि प्रेम प्रतित होते आणि आपल्या महान देशाची सामाजिक वीण आणि तत्वांची बैठक तयार करणारी अनोखी भारतीय मूल्येही यात आहेत. राम सेतू हा भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील पिढ्यांमधील दुवा आहे. भारतीय वारशातील सुयोग्य भागाची कथा सांगण्यास, विशेषत: तरुणांना ही कथा सांगण्यास मी उत्सुक आहे आणि मला आनंद वाटतो की अमेझॉन प्राइम व्हिडीओसह ही कथा सगळीकडच्या प्रेक्षकांना आवडेल आणि जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल.”

अमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाचे कंटेंट विभागाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले, “अमेझॉन प्राइम व्हिडीओमध्ये प्रत्येक निर्णय आम्ही ग्राहकांना प्राधान्य देत घेतो. भारतीय मातीशी नाळ जोडलेल्या कथा नेहमीच फक्त भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि आपल्या भारतीय वारशावर प्रकाश टाकणाऱ्या सिनेमासोबत जोडले जाण्यासाठी आम्ही सहनिर्मितीत पाऊट टाकल्याचा आम्हाला आनंद आहे. विक्रम मल्होत्रा आणि अबडेंशिया एंटरटेनमेंट तसेच अक्षय कुमारसोबतचे आमचे सहकार्य आजवरचे अनोखे आणि अत्यंत यशस्वी पाऊल ठरले आहे आणि या निर्णयामुळे आम्ही हे सहकार्य अधिक सखोल आणि दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.”

या उत्सुकतेत भर घालत अबडेंशिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा म्हणाले, “भारतात पौराणिक कथा, धर्म आणि इतिहास हे सगळं एकमेकांमध्ये गुंफलं गेलंय. आपल्या देशाचे मूळ यातूनच तयार झाले आहे आणि दमदार, एपिक कथांसाठी यातून एक भक्कम पाया मिळतो. राम सेतू हा सिनेमा सत्य, विज्ञान आणि ऐतिहासिक वारसा यावर बेतला आहे आणि यातून शतकानुशतके भारतीयांचा प्रगाढ विश्वास असलेल्या बाबींशी हा सिनेमा निगडित आहे.”

अमेझॉन प्राइम व्हिडीओ राम सेतूच्या चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर जगभरातील स्ट्रीमिंगसाठी एक्स्लुसिव्ह स्ट्रीमिंग पार्टनर आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.