आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज पृथ्वीराज अभिनीत मल्याळम क्राईम थ्रिलर, भ्रमम, 7 ऑक्टोबर 2021 ला भारतात प्रदर्शित होत असल्याची घोषणा केली. ‘भ्रमम’मध्ये पृथ्वीराज सुकुमारनसोबत उन्नी मुकुंदन, राशी खन्ना, सुधीर कारामना आणि ममता मोहनदास यांच्यासारखे अनेक प्रतिभाशाली कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. रवि. के. चंद्रनद्वारे दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माण एपी इंटरनेशनल आणि वायकॉम-18 स्टूडियोजच्या बॅनरअंतर्गत करण्यात आले आहे. (Amazon Prime Video has announced the premiere of ‘Bhramam’ starring Prithviraj on October 7)

हा चित्रपट एका पियानो वादकाच्या द्वंद्वावर आधारित असून ही व्यक्तिरेखा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने साकारले आहे, जो अंध असल्याचे नाटक करतो. त्याची संगीत यात्रा सस्पेंस, प्रेरणा, भ्रम आणि नाटक यांच्यासोबत जोडली जाते कारण तो एका मर्डर मिस्ट्री मध्ये अडकत जातो. चित्रपटाची कथा जशी जशी पुढे जाते, ती विचित्र घटना आणि व्यंगातील आरोप-प्रत्यारोपात अडकत जाते, यात संगीतकार जेक्स बिजॉय यांचे देखील योगदान राहिले आहे.

दिग्दर्शक रवि. के. चंद्रन यांनी, अमेझॉन प्राईम व्हिडिओवर होत असलेल्या आपल्या चित्रपटाच्या प्रीमियरवर म्हणाले की “मला या सुंदर प्रोजेक्टसाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत सहयोग करताना आनंद होतो आहे. यामुळे ओरिजनल प्रोडक्शनच्या आणखी वरच्या पायरीवर जाऊन चित्रपटाच्या कथेत नाटक आणि विनोदाच्या अनोख्या तत्वांना संगीताच्या मुख्य पंचसोबत एकत्रित करू शकलो. मला आनंद आहे की आम्ही सिनेमॅटोग्राफीला पुढे नेत चित्रपटाच्या कथेसोबत आमच्या रचनात्मक दृष्टिला प्रत्यक्षात आणण्यात यशस्वी ठरलो आहोत. आम्हाला आशा आहे कि एका प्रतिभाशाली टीमसोबत, आम्ही एक असा चित्रपट बनवण्यात यशस्वी झालो आहोत जो प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करेल.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.