आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Amazon Original Cinema ‘Sharmaji Namkeen’ Will Be Premiered On Prime Video On March 31, 2022. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या अभिनय वारशाला सलाम करण्यासाठी प्राइम व्हिडिओने आज त्यांचा शेवटचा सिनेमा ‘शर्माजी नमकीन’चे एक्सक्लुसिव्ह वर्ल्ड प्रीमियर जाहीर केले आहे. स्व- शोधाच्या हृदयस्पर्शी कहाणीवर आधारित असलेल्या शर्माजी नमकीन सिनेमात नुकत्याच निवृत्त झालेल्या गृहस्थाला स्वयंपाकाची आपल्याला असलेली आवड काही बिनधास्त स्त्रियांच्या भिशीत सहभागी झाल्यावर लक्षात येते. हा सिनेमा 31 मार्च रोजी 240 देशांतील प्राइम व्हिडिओवर झळकणार आहे.

हितेश भाटिया यांनी दिग्दर्शित केलेला व रितेश सिडवाणी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत मॅकगफिन पिक्चर्सचे हनी त्रेहान व अभिषेक चौबे यांच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या या कौटुंबिक सिनेमात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये दिवंगत ऋषी कपूर आणि परेश रावल तसेच जुही चावला, सुहेल नायर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चढ्ढा आणि ईशा तलवार यांचा समावेश आहे. शर्माजी नमकीन हा पहिला हिंदी सिनेमा आहे, ज्यात ऋषी कपूर आणि परेश रावल यांनी एकच व्यक्तीरेखा साकारली आहे.

‘प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवत त्यांचे मनोरंजन करण्याचा, सातत्याने तशाप्रकारचा कंटेट उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही प्राइम व्हिडिओमध्ये करत असतो,’ असे प्राइम व्हिडिओच्या कंटेंट लायसन्सिंग विभागाचे प्रमुख मनीष मेन्घानी म्हणाले. ‘शर्माजी नमकीन हा अशाच प्रकारचा मनोरंजक सिनेमा आहे. हा खऱ्या अर्थाने खास सिनेमा आहे आणि दिवंगत ऋषी कपूर यांच्या सिनेमॅटिक करिष्म्याला, अभिनय कौशल्याला सलाम करणारा तसेच परेश रावल यांच्या असामान्य अभिनयाची पावती देणारा आहे. दोन्ही अभिनेत्यांनी आतापर्यंत आपल्या अद्भुत अभिनयाने कित्येक पिढ्यांना मोहीत केले आहे. हा सिनेमा एक्सेल एंटरटेनमेंटसह दीर्घकाळापासून असलेल्या आमच्या सहकार्यातील आणखी एक नवा अध्याय आहे आणि आम्हाला खात्री आहे, की ही हृदयस्पर्शी गोष्ट भारत तसेच जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करेल.’

एक्सेल एंटरटेनमेंटचे सह- संस्थापक रितेश सिधवाणी म्हणाले, ‘एक्सेलमध्ये आम्ही कायमच चौकट मोडणारा आशय देण्यावर आणि अविस्मरणीय व्यक्तीरेखा दाखवण्यावर भर दिला आहे. शर्माजी नमकीन ही एका सामान्य माणासाच्या आयुष्याची आणि आयुष्याचा नवा अर्थ शोधण्याच्या त्याच्या प्रवासाची गोष्ट आहे. या धमाल कौटुंबिक सिनेमात आणि त्यांचा शेवटचा ठरलेल्या या सिनेमात प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासह काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. हा सिनेमाची लखलखती कारकीर्द आणि वारशाला आमचा सलाम असून या सिनेमाच्या निमित्ताने प्राइम व्हिडिओच्या सहकार्याने आणखी एक टप्पा पार करताना आम्हाला आनंद होत आहे.’

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.