चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रभास आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला  आदिपुरुष सतत चर्चेत आहे.  प्रभास आणि सैफ यांचा सामना पाहण्याची त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. वाईटावर चांगल्याचा विजय.. असत्यावर सत्याचा विजय… अशी कथानकाची थीम असलेल्या आदिपुरुषचे आजपासून शूटिंग आरंभ झाल्याची घोषणा ट्विटरद्वारे आहे दिग्दर्शक ओम राऊत याने केली आहे. सोबतच प्रभास यानेही सिनेमा शूटिंग सुरु झाल्याची घोषणा करत पोस्ट शेअर केली आहे. 

हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३डी असणार आहे. ‘सेलिब्रेटिंग व्हिक्टरी ऑफ गुड ओव्हर इव्हील’ अशी या सिनेमाची टॅगलाईन असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांचे असून, निर्मिती निर्मिती टी-सिरीज करणार आहे व सहनिर्माते म्हणून ओम राऊत, प्रसाद सुतार व राजेश नायर हे असणार आहेत. ‘आदिपुरुष’ हिंदी भाषेसोबतच तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांचे असून, निर्मिती निर्मिती टी-सिरीज करणार आहे व सहनिर्माते म्हणून ओम राऊत, प्रसाद सुतार व राजेश नायर हे असणार आहेत. ‘आदिपुरुष’ हिंदी भाषेसोबतच तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. 

ओम राऊत व “आदिपुरुष” च्या सर्व टीमला या बिग बजेट प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा.
Website | + posts

Leave a comment