आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री.  सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ असणाऱ्या या अभिनेत्रीच्या नृत्याविष्काराचेही अनेक चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून अमृता सोशल मीडियावर ‘अमृतकला’ अंतर्गत तिच्या अप्रतिम नृत्याचे व्हिडीओज शेअर करत होती. त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रेमामुळेच अमृताने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अमृताने अधिकृतरित्या स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु केले असून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Actress Amruta Khanvilkar launched her official Youtube channel)

आपल्या आवडत्या कलाकाराचा दिनक्रम, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आवडत्या जागा, पदार्थ अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते.  यात अमृताचा सकाळचा दिवस कसा सुरु होतो, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती काय करते, तिचा डाएट, तिला कशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात, कुठे फिरायला, शॉपिंगला आवडते, आईसोबत ती कसा वेळ घालवते, एकंदर तिचे लाइफस्टाईल, तिच्या आवडीनिवडी, नृत्य, अभिनय अशा तिच्यासंबंधित अनेक गोष्टींचा उलगडा यात होणार आहे. 

आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” खरं सांगायचे तर ‘अमृतकला’ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतरच स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु कारण्यासाठी अधिक प्रेरित झाले. चाहत्यांना नेहमीच त्याच्या आवडत्या कलाकाराच्या लाइफस्टाईलविषयी कुतूहल असते आणि म्हणूनच मी माझ्या चाहत्यांसोबत माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणार आहे. यात अनेक गोष्टींचा समावेश असेल. हळूहळू ते तुम्हाला कळेलच. सध्यातरी महिन्याला किमान चार -पाच व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे. पुढे बघू कसे जुळून येतेय.” 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.