गुजराती रंगभूमीचे ज्येष्ठ कलाकार व नाट्य-दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. अभिनेता शर्मन जोशी याचे ते वडील होत. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा शर्मन व टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी असा परिवार आहे.

Late Actor Arvind Joshi
Late Actor Arvind Joshi

अरविंद जोशी हे गुजराती सिनेमा व गुजराती रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय नाव होते, शिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनही सहाय्यक म्हणून अभिनय केला होता.  शोले या सिनेमात ते संजीव कुमार यांनी साकारलेल्या ठाकूर च्या मोठ्या मुलाच्या भूमिकेत चमकले होते ज्यांची हत्या गब्बर सिंग करतो. त्यांच्या निधनावर हिंदी व गुजराती कलाविश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 

Actor Arvind Joshi in Sholay
Actor Arvind Joshi in Sholay

 

अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या शोक संवेदना ट्विटर वर व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणतात- ” अरविंद जोशी यांच्या निधनाने भारतीय रंगभूमीची कधीही भरून निघणार नाही अशी हानी झाली आहे. ते एक चतुरस्त्र व अष्टपैलू अभिनेते तर होतेच शिवाय माणूस म्हणून अत्यंत उत्तम होते.”

अभिनेते अरविंद जोशी यांना नवरंग रुपेरी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. 

Website | + posts

Leave a comment