आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Actor Ranveer Singh explains why he accepted the offer of the quiz show ‘The Big Picture’  आगामी क्विझ शो ‘दि बिग पिक्‍चर’साठी उत्‍साह शिगेला पोहोचला असताना होस्‍ट रणवीर सिंगने त्‍याचे कौशल्‍य पणाला लावले आहे. नुकतेच त्‍याने या शोचे भव्‍य अनावरण केले. या इव्‍हेण्‍टदरम्‍यान रणवीरने अनेक अचंबित करणारे उलगडे करत सर्वांना अचंबित केले, ज्‍यामुळे या आगामी शोबाबत उत्‍सुकता अधिकच वाढली. पण एका उलगड्याने सर्वांचे अधिक लक्ष वेधून घेतले, ते म्‍हणजे त्‍याने सांगितले की त्‍याला गतकाळात इतर क्विझ शोजसाठी विचारण्‍यात आले होते.

या इव्‍हेण्‍टमध्‍ये रणवीरने त्‍याच्‍या मागील टीव्‍ही ऑफर्सबाबत उलगडा करण्‍यासोबत ‘दि बिग पिक्‍चर’ला होकार देण्‍यामागील कारण देखील सांगितले. तो म्‍हणाला, ”मला मागील सहा वर्षांमध्‍ये अनेक क्विझ फॉर्मेट्ससाठी विचारण्‍यात आले आहे, पण त्‍यापैकी बहुताश लक्षवेधक नव्‍हते. ‘दि बिग पिक्‍चर’च्‍या फॉर्मेटची अनपेक्षितता अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे. मला या शोसाठी विचारण्‍यात आले तेव्‍हा मी होकार देण्‍यास जरादेखील उशीर केला नाही.”

तो पुढे म्‍हणाला, ”आपण व्हिज्‍युअल युगामध्‍ये राहत आहोत. प्रत्‍येकजण दररोज मोठमोठी स्‍वप्‍ने पाहतो. ‘दि बिग पिक्‍चर’ व्हिज्‍युअल-आधारित क्विझ शो आहे, ज्‍यामुळे हा इतरांपेक्षा अनोखा शो आहे. मला बालपणापासून क्विझ शोजची आवड राहिली आहे आणि एका शोचे सुत्रसंचालन करणार असल्‍यामुळे मला खूप आनंद झाला आहे.” होस्टिंगच्‍या भूमिकेसाठी तयारीबाबत सांगताना तो म्‍हणाला, ”माझे मते, टेलिव्हिजन चित्रपटांपेक्षा अधिक आव्‍हानात्‍मक आहे. चित्रपटांमध्‍ये तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. पण टेलिव्हिजनसंदर्भात अधिक जलदपणे काम करावे लागते आणि अभिनय सादर करण्‍याचा दबाव देखील खूप असतो. मी टेलिव्हिजनवर भरपूर काही शिकलो आहे आणि यामध्‍ये अविरत क्षमता असल्‍याचे समजले आहे.”

रणवीरचा निश्चितच ‘दि बिग पिक्‍चर’मध्‍ये संपूर्ण विश्‍वास आहे. या शोच्‍या अद्वितीय व्हिज्‍युअल संकल्‍पनेला रणवीरच्‍या उत्‍साहीपणाची जोड असल्‍याने हा उद्यम निश्चितच उत्तम ठरेल. तर मग अनोख्‍या मनोरंजनासाठी सज्‍ज राहा, कारण ‘दि बिग पिक्‍चर’ काही उत्तम क्षणांची निर्मिती करणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.