‘द गाझी अटॅक’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ते ५२ वर्षांचे होते. हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी बिक्रमजीत हे सैन्यामध्ये कार्यरत होते. २००३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी ‘पेज ३’, ‘डॉन’, ‘मर्डर २’, ‘क्रिएचर’, ‘आरक्षण’, ‘टू स्टेट’, ‘द गाझी अटॅक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये बिक्रमजित यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत. 

bikramjeet kanwarpal

’24’ वेब सीरिजमध्ये ते  अनिल कपूरसोबतही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. कंवरपाल यांचा जन्म सोलन हिमाचल प्रदेश येथे झाला. १९६३ मध्ये कीर्ती चक्राने सन्मानित झालेल्या द्वारका नाथ कंवरपाल  बिक्रमजीत यांचे वडील होत.  १९८९ ते २००२ दरम्यान ते इंडियन आर्मी मध्ये कार्यरत होते.  २००२ मध्ये मेजर म्हणून त्यांनी सैन्यातून सेवानिवृत्ती घेतली.

Website | + posts

Leave a comment