आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Acclaimed singer Bhupinder Singh passed away in Mumbai. प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग यांचे सोमवारी सायंकाळी ७.४५ वाजता अंधेरी, मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. भूपिंदर सिंग यांच्या पश्चात पत्नी मिताली आणि मुलगा निहाल सिंग असा परिवार आहे.

भूपिंदर यांची पत्नी मिताली माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या, “भूपिंदर यांचे आज सोमवारी निधन झाले आणि उद्या मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांना आतड्याचा आजार होता.’’

क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलचे संचालक डॉ दीपक नामजोशी म्हणाले, “भूपिंदरजींना दहा दिवसांपूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना संसर्ग झाला होता. त्यांना  आतड्याचा आजार असल्याचा आम्हाला दाट संशय होता आणि आम्ही तपास करत होतो. त्याच वेळी त्यांना कोविड-19 झाला. सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि आम्हाला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रात्री 7:45 वाजता त्यांचे निधन झाले.”

भूपिंदर सिंग हे त्यांच्या दिल ढुंढता है, नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर में, बीती ना बीताई रैना, हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए, किसी नजर को तेरा इंतेज़ार आज भी है, बादलों से काट के, जिंदगी जिंदगी मेरे घर आना, कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता यांसारख्या लोकप्रिय गजलांसाठी ओळखले जातात. अमृतसरमध्ये जन्मलेल्या भूपिंदर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑल इंडिया रेडिओपासून केली आणि दिल्ली दूरदर्शन केंद्राशीही ते संबंधित होते. 1962 मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना एका पार्टीत गिटार वाजवताना ऐकले आणि त्यांना मुंबईला बोलावले. मदन मोहन यांनी त्यांना ‘हकीकत’ चित्रपटातील “होके मजबूर मुझे ” हे गाणे ऑफर केले. संगीतकार  खय्याम यांनी  त्यांना ‘आखरी खत’ चित्रपटातील “रुत जवान जवान” हे गाणे दिले. भूपिंदर यांनी अनेक स्वतंत्र संगीत अल्बमही प्रसिद्ध केले आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment