दसवी मध्ये अभिषेक दिसणार १० वी फेल मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत; शूटिंग सुरु होतेय २२ फेब्रुवारीपासून 

२०२० च्या अखेरीस स्वतःच्या वर्क फ्रंटवर चांगली कामगिरी करणारा अभिषेक बच्चन येत्या काही दिवसात आणखी रोमांचक सिनेमांचे शूटिंग सुरु करणार आहे. नुकतेच त्याने बॉब बिस्वास या सुजय घोषच्या प्रॉडक्शनचे शूटिंग संपविले असून आता तो २२ फेब्रुवारीपासून एका नव्या चित्रपटाच्या शुटिंगला प्रारंभ करणार आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, अभिषेक ‘दसवी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यासाठी आग्र्याला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा करणार आहेत. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान निर्मित हा चित्रपट आजच्या समाजातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करेल. अभिषेक यात एका १० वी नापास मुख्यमंत्र्याची भूमिका साकारतांना दिसणार आहे. हा एक विनोदी राजकीय चित्रपट असणार आहे. यामी गौतम आणि निमरत कौरसुद्धा या चित्रपटाचा एक भाग असणार असल्याचे वृत्त आहे. 

Abhishek Bachchan's look in Bob Biswas
Abhishek Bachchan’s look in Bob Biswas

दरम्यान, अभिषेक बच्चनने नुकतीच स्टॉक मार्केटचा ब्रोकर हर्षद मेहता यांचा चरित्रपट ‘बिग बुल’ या चित्रपटाची शूटिंग संपविली आहे व लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. अयप्पनम कोशियमच्या हिंदी रिमेकमध्ये अभिषेक व जॉन अब्राहम ही दोघे तब्बल १३ वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार आहे.

Abhishek Bachchan in Big Bull
Abhishek Bachchan in Big Bull
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.