आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Abhijit Mohan Warang directed movie ‘Prem Pratha Dhumshan’ on 28th October. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आता “प्रेम प्रथा धुमशान” या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिजित मोहन वारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटातून मालवणी बोलीत एक प्रेमकथा पहायला मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर “प्रेम प्रथा धुमशान” चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या ‘पिकासो’ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘देजा वू’ एकच अभिनेता असलेला अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत.

‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट मालवणी बोलीभाषेतला आहे. शिवाली परब या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवालीबरोबर विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, अक्षता कांबळी, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे कलाकार आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे.

मालवणी बोलीचा वापर चित्रपटात बहुतांशी विनोदनिर्मितीसाठी केला गेला. पूर्ण मालवणी बोलीतले चित्रपट अगदीच मोजके आहेत. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.