-अशोक उजळंबकर 

न ये चाँद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे.’ होय! या गीताचा गायक हेमंत कुमार (Singer and Music Director Hemant Kumar) नेहमीकरिता आमच्यात राहणार आहे. १९५४ साली प्रदर्शित ‘शर्त’ या चित्रपटातील हे गाणं हेमंत कुमार व गीता दत्त या दोघांच्याही आवाजात ध्वनिमुद्रित झालं होतं. इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणारा हा कलावंत गायक झाला. गायन हा त्याचा बालपणापासूनचा छंद होता. पार्श्वगायन करीत असतानाच अचानक निर्माता शशिधर मुखर्जी यांनी त्यांना ‘आनंदमठ’ या चित्रपटाकरिता संगीतकार म्हणून निमंत्रित केलं. हेमंत कुमार यांच्याकडे संगीत देण्याची किमयादेखील आहे हे त्यांनी ओळखलं होतं. ‘आनंदमठ’ या चित्रपटाकरिता लतादीदीने गायलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत अमर झालं. अशा रीतीने संगीतकार म्हणून हेमंत कुमार यांचा प्रवास सुरू झाला. १९५२-१९६२ या दहा वर्षात त्यांनी असंख्य अविस्मरणीय गाणी दिली. (Remembering Singer and Music Director Hemant Kumar One of the Finest from Golden Era of Hindi Film Music) 

१९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नागिन ‘ या चित्रपटाच्या गाण्यांनी तर त्या काळी अफाट लोकप्रियता मिळवली होती. यामधील बीन कल्याणजी यांनी वाजवली होती. या चित्रपटात एकंदर १२ गाणी होती. सर्वच गाणी एकापेक्षा एक होती. त्यापैकी ‘मन डोले मेरा तन डोले’, ‘जादूगर सैयाँ छोड मोरी बैय्या’, ‘ऊंची ऊंची दुनिया की दिवारे सैया तोडके’, ‘मेरा बदली मे छुप गया चाँच ” या गीताचा मे खास उल्लेख करावा लागेल. हेमंतकुमार यांच्या आवाजातील ‘तेरे द्वार खडा एक जोगी’ व ‘ओ जिंदगी के देनेवाले जिंदगी के लेनेवालेचा दर्द अप्रतिम होता. ‘शर्त’मधील लता-हेमंत यांच्या आवाजातील ‘देखो वो चाँद छुपके करता है क्या इशारे’ हे द्वंद्वगीत दुर्गेश नंदिनीमधील, लतादीदीची पुकार ‘कहाँ ले चले हो बता दो मुसाफीर, सितारोंसे आगे ये कैसा जहाँ है’.

बी. आर. चोप्रा यांचा ‘एक ही रास्ता हा अशोककुमार मीना कुमारी, सुनील दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाकरिता हेमंतकुमार यांनी एक सुरेख गीत गायलं होतं. त्या गीताचे बोल होते, ‘चली गोरी पियाके मिलन को चली’, ‘चंपाकली’ हा सुचित्रा सेन, भारत भूषण यांचा चित्रपट. या चित्रपटाकरिता एक दर्दभरे गीत लतादीदीने गायले होते. त्या गीताचे बोल होते, ” छुप गया कोई रे दूर से पुकारके, दर्द अनोखे हाय दे गया प्यार के”. मिस मेरी हा दक्षिणेकडील चित्रपट होता या चित्रपटाला हेमंत कुमार यांनी संगीत दिले होते या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ये मर्द बडे बेदर्द बड़े बेदर्द चलो जी जाना’, तर याच चित्रपटाकरिता महंमद रफी- लता मंगेशकर यांनी युगुल स्वरात गायलेलं, ‘वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी आँखों का तारा’ हे गीत, तर ‘ओ रात के मुसाफीर चंदा जरा बतादे, मेरा कसूर क्या है, तू फैसला सुना दें’, हे चंद्राकडे तक्रार करून दाद मागणार एक अप्रतिम गीत. मिस मेरी या चित्रपटाची नायिका मीना कुमारी तर नायक जमिनी गणेशन होता. मद्रास कडील ए .वी .एम . या बॅनर खाली तयार झालेल्या या चित्रपटात जमुना, किशोर कुमार, ओमप्रकाश यांनी काम केले होते. हेमंत कुमार यांची ही संगीतमय मेजवानी होती.

‘बीस साल बाद’ ही गीतांजली पिक्चर्स म्हणजे निर्माता हेमंतकुमार यांची निर्मिती. १९६२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. सोलापूरच्या ‘उमा’ सिनेमा हॉलमध्ये एकट्याने बसून एका प्रेक्षकाने हा चित्रपट पाहिला होता व सायकल बक्षीस स्वरूपात जिंकली होती. एकदा लतादोदोला डॉक्टरांनी तुम्ही आता गाऊच शकणार नाही असे सांगितलं होतं. अशा वेळी लतादीदी गाण्याकरिता उभ्या राहिल्या. या गीताचे बोल होते, ‘कही दीप जले कही दिल जरा देखले आकर परवाने, तेरी कौनसी है मंजिल’ लतादीदीचा स्वर अमर करून टाकणाऱ्या काही मोजक्या गीतात या गीताचा समावेश होतो. हे गाणं होतं ‘बीस साल बाद’ या चित्रपटाचं. १९६२ याच वर्षी गुरुदत्त फिल्मच्या ‘साहिब, बीबी और गुलाम’ या चित्रपटाची गाणी हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केली होती. आशा भोसले यांच्या आवाजातील ‘मेरी बात रही मेरे मनमे’, ‘मेरी जा ओ मेरी जा अच्छा नही इतना सितम’, ‘भंवरा बडा नादान है, बगियन का मेहमान है’ व ‘साथिया आज मुझे निंद नही आयेगी’ ही चारही गाणी कमालीची लोकप्रिय ठरली, तर याच आशासोबत गीता दत्तची गाणी कुठेच कमी नव्हती. ‘न जाओ सैंय्या  छुडाके बैंय्या, कसम तुम्हारी मैं रो पड़ूँगी  चा दर्द व पुकार आठवा, तर ‘पिया ऐसो जिया में समाय गयो रे, कि मै तन मन की सुदबुध गवा बैठी’ हे आपल्या प्रियकराच्या मिलनाचं वर्णन करणारं गाणं लाजवाबच म्हणावं लागेल.

‘कोहरा’ हा ‘बीस साल बाद प्रमाणेच रहस्यमय चित्रपट होता. हीदेखील गीतांजली पिक्चर्सचीच भेट. या चित्रपटातील ‘झुम झुम ढलती रात, लेके चली मुझे ‘अपने साथ’ या गीतातील रहस्याची झालर, तर हेमंतकुमार यांच्या आवाजातील ‘ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे, जरा पिने दो’मधील रहस्याचा भेदकपणा अवर्णनीय असाच होता.

अनिल चॅटर्जी हा बंगाली नायक. गीतांजली पिक्चर्सचा ‘फरार’ चा तो नायक होता. या चित्रपटातील हेमंत कुमार यांनी गायलेल्या ‘लोग पिते हे लडखडाते है, दिलसे दुनिया का गम भुलाते हैं’ हे गाणं. ‘खामोशी’मधील पार्श्वभूमीवर नायकाने शांत सुरात गायलेली पुकार ‘तुम पुकार लो तुम्हारा इंतजार हैं’ हे गाणं. गायक म्हणून हेमंतकुमार यांनी १९७२ सालीच आपलं गाणं थांबविलं होतं; परंतु संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द ‘लव्ह इन कॅनडा’ या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटापर्यंत चालू होती. गायक म्हणून हेमंतकुमार यांनी अनेक गाणी गायली; परंतु हेमंत कुमार यांना गायक म्हणून जे यश मिळालं ते या दोघांना मिळवता आलं नाही. अनेक नाटकांकरिता गायक हेमंत कुमार यांचा आवाज त्या काळी फिट बसला होता.

त्रिकुटापैकी एक म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या देव आनंद यांच्याकरिता ‘जाल’मधील ‘ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां’ हे गाणं तर ‘पतिता’ या उषाकिरणसोबतच्या चित्रपटातील ‘याद किया दिलने कहाँ हो ‘तुम’ हे गाणं. विश्वजीतकरिता ‘बीस साल बाद’मधील दोन्ही सुरेख गायली होती. ‘जरा नजरों से कहदो जी निशाना चूक ना जाये’, ‘बेकरार करके हमे यु ना जाईये, आपको हमारी कसम लौट आईये’ तर ‘कोहरा’मधील ‘राह बनी खुद मंजील, पिछे रह गई मुश्कील’ हे गाणं. हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा ‘ही मॅन’ धर्मेंद्रकरिता गायलेलं ‘पुकारलो, तुम्हारा इंतजार है’ हे गाणं तर याच चित्रपटातील ‘या दिल की सुनो दुनियावालों या मुझको अभी चुप रहने दो’ हे गाणं, शम्मी कपूरकरिता ‘ब्लफ मास्टर’ या चित्रपटातील ‘ए दिल अब कहीं न जा, ना किसी का है तू ना कोई तेरा’ हे गीत.

संगीतकार म्हणून हेमंत कुमार यांची कारकीर्द यशस्वी ठरली. ईशान्य भारताचं लोकसंगीत, बंगालचं रवींद्र संगीत, शास्त्रीय संगीत व स्वतःची सृजनशीलता या सगळ्यांचा अचूक मेळ त्यांनी आपल्या संगीतात केला. दिग्गंज संगीतकार येथे कार्यरत असताना हेमंतकुमार यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही हे खरे. गायक हेमंतकुमार म्हणून त्यांच्या कंठातून आलेली आर्तता, तडफड इतरांच्या गळ्यात आढळणे कठीण. ‘नागिण’ या चित्रपटातील ‘ओ जिंदगी देनेवाले जिंदगी के लेनेवाले, प्रीत मेरी छिन के तुझे क्या मिला.’ अनुप जलोटा यांना एकदा मुलाखतीत हेमंत कुमार यांच्या आवाजाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले होते की, ‘हेमंत कुमार यांच्या आवाजात समुद्राची खोली व आकाशाची विशालता अनुभवास मिळते. ‘

लता मंगेशकर व हेमंत कुमार यांची अनेक युगुलगीतं गाजली. त्यापैको ‘अरी छोड़ दे सजनीया छोड़ दे पतंग मेरी छोड़ दें नागिण, ‘आ निल गगनतले प्यार हम करे’ बादशाह, ‘देखो वा चाँद छुपके करता है क्या इशारे’ शर्त, ‘नैन से नैन नही मिलाओ’ झनक झनक पायल बाजे, ‘नई मंजील नई राहें नया है मेहरबाँ अपना – हिल स्टेशन, ‘ओ निंद न मुझको आये, दिल मेरा घबराये पोस्ट बॉक्स ९९९. – “तुम्हे याद होगा कभी हम मिले थे’ सट्टा बाजार, ‘एक बार जरा फिर कह दो, मुझे शरमाके तुम दिवाना’ बिन बादल बरसात, ‘छुपा लो यु दिल में प्यार मेरा’ – ममता, ‘बहारो से पूछो, नजारोंसे पूछो मुझे तुमसे प्यार है’ फैशन, ‘इतना तो कहदो मुझसे, तुमसे ही प्यार है’ सहेली, ‘ये झुमते नजारे, तुम पास हो हमारे नई राहे, ‘जाग दर्द इश्क जाग’ अनारकली. या गीतांचा उल्लेख करावा लागेल..

आशा भोसले व हेमंतकुमार यांच्या द्वंद्वगीतापैकी ‘ये हँसता हुआ कारवाँ जिंदगी का चला है किघर एक झलक, या एकाच गाण्याचा खास उल्लेख करावा लागेल. हेमंतकुमार यांनी ‘जागृती’ या चित्रपटाकरिता गायलेलं ‘दे दी हमे आजादी बिना खङग बिना ढाल’ व ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये झाँकी हिंदुस्थान की’ हे गाणं संस्मरणीय असंच आहे. निर्माता, गायक, संगीतकार अशा तिन्ही रूपात हेमंतकुमार यांची छोटीशी कामगिरी; परंतु लक्षात राहण्यासारखी होती. त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘याद किया दिल ने कहाँ हो तुम, झुमती बहार है कहाँ हो तुम’ असंच म्हणावं वाटतं. सगळ्या गायकांपेक्षा हटके म्हणजेच वेगळा आवाज असलेला हा महान गायक.

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment