आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आताच्या पिढीला झी मराठी वरील जवळपास सर्वच गाजलेल्या मालिकांच्या शीर्षक गीतांचे संगीतकार इतकीच संगीतकार अशोक पत्की (Music Director Ashok Patki) यांची ओळख आहे. पण संगीतकार म्हणून चित्रपट, रंगभूमी, दूरदर्शन, आकाशवाणी, जिंगल्स असा त्यांचा गेल्या ४५ वर्षाच्या प्रवासाची या पिढीला फार कमी माहिती आहे. सर्वजण त्यांना प्रेमाने पत्की काका किंवा अशोक काका संबोधतात. आज अशोक काका ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ यात. (Lesser known Interesting Facts about Marathi Music Director Ashok Patki)

१. मुंबईतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या अशोक काकांचे वडील एक गिरणी कामगार होते. गोविंद पत्की त्यांचे नाव.

२. बहीण मीना पत्की ज्या हिंदीतल्या नावाजलेल्या संगीतकारांकडे गात, त्यांच्यामुळे काकांचा संगीताशी जवळून संबंध आला.

३. पं. मनोहर चिमटे यांच्याकडे हार्मोनिअमचे शिक्षण घेतले व त्यानंतर लहान मोठ्या संगीत कार्यक्रमांद्वारे संगीत क्षेत्राशी नाते वाढत गेले.

Music Director Ashok Patki

४. संगीतकार एस.डी. बर्मन, शंकर जयकिशन, आर.डी. बर्मन, रॉबिन बॅनर्जी, बी.एच. कोहली यांच्याकडे वादक व सहाय्यक संगीतकार म्हणून काम केले. त्याकाळातच श्यामराव कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

५. आकाशवाणीच्या माध्यमातून तब्बल २० वर्षे जाहिरातींसाठी व कार्यक्रमांसाठी जिंगल्स बनविण्याचे काम केले. याच काळात दूरदर्शन साठी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ व ‘पूरब से सूर्य उगा’ या दोन गीतांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

६. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत असतांना नाट्य संगीताशी परिचय झाला. १९८५ सालचे ‘मोरूची मावशी’ हे संगीतकार म्हणून पहिले नाटक.

७. भ्रमाचा भोपळा, बिऱ्हाड-बाजलं, दिसतं तसं नसतं, अखेरचा सवाल, तसे आम्ही सज्जन, ब्रम्हचारी, लग्नाची बेडी, गांधी विरुद्ध गांधी इत्यादी संगीतकार म्हणून त्यांची गाजलेली नाटके. तब्बल २५० पेक्षाही जास्त नाटकांना संगीत दिले. नाटकाचे परदेश दौरे करत असतांना जादू ‘तेरी नजर हा ऑपेरा खूप गाजला.

८. भावगीतांचे संगीतकार म्हणून अशोक काकांच्या केतकीच्या बनी, एकदाच यावे सखया, सहज तुला गुपित, काल राती स्वप्नामध्ये, सूर झंकारले, अनुरागाचे थेंब झेलती, या गीत तू सतारी, हसलीस एकदा आदी काही गीतांनी रसिक श्रोत्यांना भुरळ घातली.

९. १९८५ साली ‘पैजेचा विडा’ या चित्रपटाद्वारे चित्रपट संगीत दिग्दर्शनात पहिले पाऊल ठेवले. अर्धांगी, आपली माणसं, एकापेक्षा एक, प्रेम करू या खुल्लमखुल्ला, हेच माझं माहेर, भेट, बिनधास्त, आईशप्पथ, अंतर्नाद, सावली, मी सिंधुताई सपकाळ, तुकाराम आदी काही गाजलेल्या चित्रपटांसह सव्वाशेहून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यासाठी त्यांना राष्ट्रीय सन्मान, राज्य शासनाचे पुरस्कार व इतरही अनेक पुरस्कार मिळाले.

१०. ८० च्या दशकात गाजलेली गोट्या या मालिकेच्या शीर्षक गीतापासून त्यांचा शीर्षक गीतांचा प्रवास सुरु आहे. पिंपळपान, आभाळमाया, वादळवाट, मानसी, अधुरी एक कहाणी या मालिकांच्या शीर्षक गीतांना अलीकडच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या त्यांच्या ‘राधा ही बावरी’ या गीताने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.

आज अशोक काका वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आजही ते त्याच उत्साहाने कार्यरत आहेत.

अशा प्रतिभासंपन्न संगीतकारास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.