स्वतः व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ डॉक्टर जरी असले तरी दर्जेदार सिनेमांची व नाटकांची अचूक नस सापडलेले व्यक्तिमत्व म्हणजे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (Director Dr. Jabbar Patel). मूळचे पंढरपूरचे. सोलापुरात शालेय शिक्षण घेत असतांना त्याकाळचे नाट्यक्षेत्रातले मोठे प्रस्थ श्रीराम पुजारी यांच्याकडे जब्बार रहात होते व तिथूनच जब्बार यांचा नाट्यक्षेत्राशी संबंध आला. आज जब्बार पटेल सरांचा वाढदिवस.(Birthday Wishes to Film Director Dr. Jabbar Patel)
त्यांचे वडील भारतीय रेल्वेमध्ये नोकरीस होते. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण हरीभाई देवकरण हायस्कूल सोलापूर येथे झाले. श्रीराम पुजारींकडे नाट्यक्षेत्रातील अनेक व्यक्ती येत व जब्बार या सर्वांच्या पाहुणचाराची व्यवस्था सांभाळीत. या सर्वांच्या बोलण्यातून नाटकातले सर्व बारकावे जब्बार शिकले व लगेचच त्याचे प्रात्यक्षिक शाळेतील नाटकांमध्ये केले. पुढे पुण्यात बी.जे. मेडिकल कॉलेजात वैद्यकीय शिक्षण घेत असतांना जब्बार यांच्यावर विजय तेंडुलकर यांच्या साहित्याचा, नाटकांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या साहित्यावर आधारित अनेक नाटके जब्बार यांनी कॉलेजात शिकत असतांना बसवली व त्या नाटकांना अनेक पुरस्कारही मिळाले.

 

शिक्षण संपवून पुण्याजवळ दौंड येथे डॉक्टरकीची प्रॅक्टिस चालू असतांना अशी पाखरे येती, घाशीराम कोतवाल या नाटकांची संध्याकाळी तालीम चालूच असे. कवी रामदास फुटाणे यांच्या आग्रहामुळे व निर्माते म्हणून मिळालेल्या पाठींब्याने जब्बार यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपट होता ‘सामना’. साल १९७४. जब्बार यांच्या दिग्दर्शक म्हणून या पहिल्याच सिनेमाला थेट आंतरराष्ट्रीय बर्लिन चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाले व त्यानंतर जब्बार यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

 

जैत रे जैत, सिंहासन, उंबरठा, पथिक, एक होता विदूषक, मुक्ता, डॉ बाबासाहेब आंबडेकर असे काही एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या यादीत आहेत. जब्बार हे पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे फेस्टिव्हल डायरेक्टर म्हणून ते काम बघतात.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य जब्बार पटेल यांनी अतिशय यशस्वीरीत्या पेलले होते ज्याची पावती त्यांना चित्रपटास मिळालेल्या तीन राष्ट्रीय पुरस्कारातून प्राप्त झाली. जब्बार यांनी काही नाटकात अभिनय तसेच काही लघुपटांची निर्मिती सुद्धा केली आहे.

अशा अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅप्पी बर्थडे जब्बार सर! Happy Birthday Dr. Jabbar Patel Sir!!
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.