अजिंक्य उजळंबकर
स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

“सुप्रिया सचिन पिळगावकर” …पूर्वाश्रमीच्या ‘सुप्रिया सबनीस’. १९८४ साली ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हिट झाला आणि १९८५ साली ही नवरी सुप्रिया, नवरा सचिनजींच्या आयुष्यात अर्धांगिनी म्हणून आली. अर्धांगिनी या नात्याला खऱ्या अर्थाने जगलेल्या सुप्रियाजींचा आज वाढदिवस. सचिनजींचा वाढदिवस उद्या व सुप्रियाजींचा आज. (Birthday Greetings to always smiling and cheerful Supriya Sachin Pilgaonkar)

सुप्रियाजींचा जन्म मुंबईचा. शाळेत असतानाच सुप्रियाजींनी नाटकातून कामे करायला सुरुवात केली. पुढे सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’ च्या ‘हिमगौरी आणि सात बुटके’ या नाटकात त्यांनी काम केले आणि आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला. ‘भामटी आणि बावळे’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेतून प्रभावीत झालेल्या सचिनजींनी सुप्रिया यांना ‘नवरी मिळे नवऱ्याला’ जे साठी साइन केले ते जणू पुढे आयुष्यभरासाठीच. २१ डिसेंबर १९८५ रोजी सचिन आणि सुप्रिया विवाहबद्ध झाले. अशी ही बनवाबनवी, माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, कुंकू आदी काही ८०-९० च्या दशकातील चित्रपटानंतर सचिन सुप्रिया यांची जोडी थेट दिसली ती ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात २००४ साली. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ साठी फिल्मफेअर व ‘माझा पती करोडपती’ साठी त्यांनी राज्य पुरस्कार पटकावला. एक गृहिणी व आई या दोन्ही भूमिका सांभाळत स्वतःच्या कारकिर्दीवरही त्यांनी तेवढेच लक्ष दिले.

दरम्यान सुप्रियाजींनी हिंदी चित्रपटात चरित्र भूमिकाही केल्या. तसेच टेलिव्हिजन वर रिमा लागू यांच्यासोबतच्या कॉमेडी सीरिअल ‘तू तू मै मै’ ने सुप्रियाजी घराघरात जाऊन पोहोचल्या. वयाच्या चाळीशी जवळ आल्यावर, २००५ साली ‘नच बलिये’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये सचिनसोबत त्या विनर ठरल्या. सुप्रियाजींनी बऱ्याच हिंदी मालिका व चित्रपटातून चरित्र भूमिका साकारल्या आहेत. ‘तू तू मै मै’ सोबतच ‘ससुराल गेंदा फुल’ व ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाकरिता त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. ‘होम’ या अल्ट बालाजी वरील वेब सिरीजमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले तसेच त्यांना पुरस्कारही मिळाला.

सुप्रियाजींचा सतत हसतमुख व प्रफुल्लित चेहरा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची मुख्य ओळख आहे. अर्धांगिनी या नात्याने सचिनजींसोबत संसाराचा गाडा यशस्वीरीत्या ओढणाऱ्या सुप्रिया या, सचिनजींना त्यांच्या करिअरमध्ये मिळालेल्या यशामध्ये बरोबरीच्या वाटेकरी आहेत. ‘एकुलती एक’ मुलगी व अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिच्या पाठीशी तिच्या करिअरच्या सर्व महत्वाच्या निर्णयांमध्ये आई म्हणून सुप्रिया नेहमीच खंबीरपणे उभ्या राहतात.

Supriya Pilgaonkar

अशा हसतमुख  सुप्रियाजींना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.