नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्मवर्क, अल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘ताऱ्यांचे बेट’ (Taryanche Bait) या मराठी चित्रपटाचा आज दहावा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने प्रसिद्ध चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी एक दिलखुलास व्हिडिओ शेअर करत, या अप्रतिम कथानकासाठी आणि त्यांना त्याचा भाग बनवण्यासाठी नीरज पांडे (Neeraj Pandey) आणि फ्रायडे फिल्मवर्क्सबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

व्हिडिओमध्ये, खेडेकर यांनी सांगितले की असा चित्रपट काळाची गरज आहे. ते म्हणतात, “मला ‘ताऱ्यांचे बेट’चा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. हा एक अतिशय गोड चित्रपट आहे आणि मला यातील भूमिका साकारताना आनंद मिळाला. या विषयात ग्रामीण भागातील निरागसता आणि सकारात्मकता आहे आणि मला वाटते की आधीच्या तुलनेत या सगळ्याची आताच्या चित्रपटांमध्ये अधिक आवश्यकता आहे.” चित्रपटाचे कथानक कोकणातील श्रीधर या सामान्य कारकुनाभोवती फिरते. तो आपल्या कुटुंबियांना मुंबईत फिरायला घेऊन येतो. शहराचा देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला, त्याचा मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा आग्रह धरतो आणि आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचा श्रीधरचा कठीण प्रवास सुरू होतो.

चित्रपटामध्ये दाखवलेल्या मूल्यांबद्दल बोलताना खेडेकर म्हणतात, “पालक नेहमीच आपली नैतिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मुलांवर सोपवतात आणि त्यांना हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे. परंतु मुले तुम्हाला अधिक शिकविण्यात नेहमीच यशस्वी ठरतात, हे कदाचित कोणाला समजले असेल.”

सचिन खेडेकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे किरण यज्ञोपवीत (Kiran Yadnyopavit) यांचे आभार मानले आणि नीरज पांडे यांच्या विषयीही गौरवोद्गार काढले, ते म्हणाले की, ” क्रिएटिव्ह निर्माता, नीरज पांडे यांनी खूप मदत केली. त्यांनी या कथेला पाठिंबा दिला आणि आम्ही हा चित्रपट तयार करू शकलो आणि त्यासाठी पुरस्कारही मिळाले. फ्रायडे फिल्मवर्क्सने, या सुंदर चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आणि मला याचा भाग बनवल्याबद्दल आभार.”

या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनय आपटे (Vinay Apte), अश्विनी गिरी (Ashwini Giri), अश्मिता जोगळेकर (Ashmita Joglekar) , किशोर कदम (Kishore Kadam), शशांक शिंदे आणि ईशान तांबे (Ishaan Tambe) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याची एकता कपूर (Ekta Kapoor), शोभा कपूर आणि नितीन चंद्रचूड यांनी सहनिर्मिती केली होती.

या गौरवशाली दहाव्या वर्धापनदिनानिमित्त (10 Years Of Taryanche Bait) कलाकार, क्रू, नीरज पांडे, शीतल भाटिया आणि फ्रायडे फिल्मवर्क्स यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आशा आहे की ते भविष्यातही आम्हाला अशी दुर्मिळ रत्ने देत राहतील.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.