-जयश्री जयशंकर दानवे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘एक तरफ हजारो पंछी, पिंजरोंसे छूट कर अपनी आजादीका ऐलान कर रहे थे, दुसरी तरफ आकाशमें उडता हुआ मासूम परिंदा, पिंजरेमें कैद होनेका जहर तनहा पी रहा था l अदाकाराने नन्ही महजबीका हाथ पकडकर मुस्कुराते हूए उसे पूछा ‘ जानती हो मै कौन हूं ? तुम्हारी सहेली अदाकारा…’ बचपनकी दहलीज पर खडी वह मासूम, कमसिन, पहली बार इस सहेलीसे मिल रही थी l अदाकारा बोली ‘ कुछ बरसोंकी दूरी पर तुम्हारी जवानी तुम्हारा इंतजार कर रही है …. आओ मै तुम्हे उसके पास ले चलूं l’ उस बच्चीकी आंखोमें दसों सवाल थे l उसे अदाकारा एक जादूगरनी लगी l वह अदाकाराके इशारोंके पीछे खिंची चली जा रही थी l मासूम महजबीने पीछे मुडकर देखा,शायद कोई उसके लापता होने का पता ढूंढता पीछे पीछे आ रहा हो l अदाकारा बोली ‘ किसको ढूंढ रही हो… कोई नही आयेगा… सभी जानते है तुम मेरे साथ हो… ’कॅमेरा…लाईट्स… ऐक्शन….स्टार्ट….कट….ओ.के…… ये तमाम नये लफ्ज उस बच्चीकी आदतमे शामिल होते जा रहे थे… चेहरेपर मेकअपकी परतें उसकी असलियतको छिपानेकी नादान कोशिशे कर रही थी… यह सब बेहद अजीब था l खिलौनेकी जगह कॅमेरे और लाईट्स….गुडियोंकी जगह अजनबी इन्सानी खिलौने….यही से लुट जानेका खौफ महजबीकी जिंदगीका हिस्सा बन गया l जवानीके हाथोमें महजबीको सौंपते हूए अदाकाराने अपना लिबास उतारकर उसे पहना दिया और महजबीको आईनेके मुखातिब ले जाकर कहा ‘ अब तुम मीनाकुमारी हो l ’

दूर खडे कोई तलबगार शायरने मीनाके कानोंमें धीरेसे कहा, ‘ आप बहुत हसीन हैं…आपकी आंखो में इबादत की पाकीजगी है ….जुल्फों में खाव्बों के दरीचे और आवाज में गजलसरा का सोज भरा है …आप खुदा की हसीन अमानत हैं….खुदको महफूज रखिएगा… l

      हिंदी चित्रपटातील सौंदर्याचे बरेचसे मापदंड पूर्ण करणारी चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची अभिनय सम्राज्ञी मीनाकुमारी. ‘परिणीता’ पासून ‘पाकिजा’ पर्यंतच्या तिच्या बहुरंगी, बहुढंगी अविस्मरणीय भूमिकांमुळे ती प्रेक्षकांच्या हृदयस्थ आहे. वयाच्या चौदा वर्षापासून या अभिनय सम्राज्ञीचा सुरु झालेला अभिनय प्रवास १९७२ च्या ‘गोमती के किनारे’ पर्यंत कसा फुलत गेला, कोणती आव्हानं, कोणत्या कसोटया पार करून अभिनयाच्या अत्युच्च शिखरावर तिला पोहचता आलं, याचा चित्तवेधक आढावा घेणं हे तर कठीण काम आहे. ‘आपल्या कार्यावर असामान्य निष्ठा असलेली मीनाकुमारी ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे’ या अशोककुमारांच्या अभिप्रायावरून मीनाकुमारीच्या समाज्ञीपणाला दुजोरा मिळतो. मीनाकुमारी म्हणजे अभिनयातलं एक उत्तुंग शिखर. करूणरसांची अनभिषिक्त सम्राज्ञी. शरीरसौंदर्य आणि शब्द सौंदर्याचा अनुपम मिलाफ म्हणजे मीना कुमारी. (Actress Meena Kumari, Hindi Cinema’s Tragedy Queen)      

हिंदी चित्रपटसृष्टीतलं विलक्षण गूढरम्य व्यक्तिमत्व म्हणजे मीना कुमारी. तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वच गोष्टींबद्दल उलटसुलट चर्चा होत राहिल्या. तिच्या बाबतीत वादातीत होत्या फक्त दोनच गोष्टी तिचं शालीन सौंदर्य आणि तिचा अनन्यसाधारण अभिनय. ती सिनेजगतात ‘ट्रेजेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध होती. तो काळ असा होता की मीनाकुमारी म्हणजे साक्षात अभिनयातला अखेरचा शब्द मानला जात होता. तिच्या आयुष्यात ती तब्बल बारावेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित केली गेली आणि चार वेळा तिला तो पुरस्कार मिळाला. हा विक्रम क्वचितच त्या काळात कोणा अभिनेत्रीला प्राप्त झाला असेल. तिने ९० चित्रपट केले आणि २५ ते ३० नायकांसोबत कामं केली. मीना कुमारी ही एकेकाळी आघाडीची नायिका होती. प्रथम अत्यंत सुमार चित्रपटात महीपाल आणि आगा यांच्याबरोबर नायिका म्हणून काम करणाऱ्या मीनाकुमारीनं आपल्या अस्सल अदाकारीनं आणि अतिशय निरागस, मार्दव असलेल्या गोड चेहऱ्यानं प्रेक्षकांची मनं पाहता पाहता जिंकून घेतली.

मीना कुमारीच्या वडिलांचे नांव अलीबक्ष. अलीबक्षना संगीताविषयी आवड होती. ते उर्दू कविताही करत. कविताना चाली लावण्यासाठी त्यांनी बाजाच्या पेटीचे शिक्षणही घेतले होते. त्यांच्या गावात ते मास्टर अलीबक्ष म्हणून मोठ प्रस्थं होते. ते १९२४-२५ च्या सुमारास मुंबईत आले. तिथे त्यांना हार्मोनियमची साथ करण्याचे काम मिळाले. मीनाकुमारीची आजी म्हणजे गुरुदेव रविंद्रनाथांच्या छोटया भावाची मुलगी. ती विधवा झाल्यानंतर तिनं ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. तिची मुलगी प्रभावती म्हणजे मीनाकुमारीची आई. ती एक कलाकार होती. पारशी नाटक कंपनीत जेव्हा ती भरती झाली तेव्हा तिला अलीबक्ष भेटले. तिला इस्लाम धर्म पत्करायला लावून त्यांनी तिला इकबाल बेगम बनवलं आणि तिच्याशी लग्न केलं. म्हणजेच मीना कुमारी ही रवींद्रनाथ टागोरांच्या परिवाराशी संबंधित होती हे बऱ्याच रसिकांना माहित नाही. अलीबक्षना खुर्शीद व माधुरी अशा दोन मुली झाल्या आणि नंतर पुन्हा मुलगीच झाली. मीना कुमारीचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तेव्हा मात्र आर्थिक विवंचनेत असणाऱ्या अलीबक्षनी ते लहान बाळ एका अनाथगृहाच्या पायरीवर नेऊन ठेवलं.तिथं एक फकीर आला तो म्हणाला, ‘ये बेटी नहीं चांद है, तुम्हारी सारी चिंता मिटा देगी.’ हे ऐकताच अलीबक्ष तिला घेऊन घरी आले आणि तिचं नांव मेहजबीन ठेवलं. तीच ही मीनाकुमारी. आई वडील तिला घरात मुन्ना म्हणून हाक मारत व मुलाची हौस भागवत. ती मुळात अत्यंत देखणी व स्वभावानं हळवी मुलगी होती. तिचे शिक्षण फारसे झाले नाही. आर्थिक तरतूद करण्यासाठी अलीबक्ष मेहजबीनला घेऊन चित्रपट स्टुडीओ पालथे घालत. अखेर पाच वर्षांच्या या चिमुरड्या हिऱ्यांच मोल करणारा रत्नपारखी विजय भट्ट त्यांना भेटला आणि मेहजबीन बाल कलाकार बनली. तिने ‘अधुरी कहानी, विजया, कसोटी, पूजा, गरीब’ अशा अनेक चित्रपटांत बेबी मीना या नावानं बाल कलाकार म्हणून चित्रपट केले. १९५१ साली वाडिया मुव्हीटोन चित्रसंस्थेद्वारे ‘लक्ष्मीनारायण’ चित्रपटांत ती लक्ष्मीची भूमिका करू लागली. तेव्हा ती मुस्लीम आहे हे सांगूनही लोकांना पटत नसे. पाहता पाहता चित्रजगतात तिने तारुण्यात प्रवेश केला. अन ती बेबी मीनाची मीनाकुमारी बनली.

१९५२ साली ‘बैजू बावरा’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात मोगल काळातल्या सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी एक सूरसम्राट बैजू तानसेन याचा प्रतिशोध घेतो. या चित्रपटात मीनाकुमारी बैजूची प्रेयसी गौरी असते. शेवटी यमुनेच्या पुराच्या पाण्यात गौरी सापडते. बैजू तिला वाचवायला उडी घेतो अन दोघेही यमुनेच्या रौद्र रुपात लुप्त होऊन मृत्यूला शरण जातात. त्यात नौशाद यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि मीना कुमारीचा काळजाला भिडणारा अभिनय. यामुळे हा चित्रपट हिट झाला. धो धो चालला. शिवाय त्याने सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड ज्युबिली साजिरी केली इतकेच नाहीतर शतकमहोत्सवी साजरी केली. आणि मीनाकुमारीची कीर्ती गगनाला भिडली. त्यावेळी मीनाकुमारी वीस वर्षांची होती. त्याच वर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सुरु झाला आणि पहिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बैजू बावरासाठी मीनाकुमारीला मिळाला. मीनाकुमारीची गौरी घराघरात पोहचली. हा पुरस्कार सोहळा २१ मार्च १९५४ ला मुंबईच्या मेट्रो थिएटरमध्ये संपन्न झाला. त्यानंतर ‘परिणीता, साहिब बीबी और गुलाम, काजल’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मीनाकुमारीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यामुळे ती आघाडीची नायिका बनली.

     ‘महल’ चित्रपट बनवताना कमाल अमरोहीना कोणीतरी मीनाकुमारीबद्दल सांगताच ते म्हणाले, ‘ इस नाम की लडकी न खुबसुरत हो सकती है न ही एकट्रेस.’ आणि त्यांनी महलमध्ये मधुबालाला घेतले. पण म्हणतात ना वक्त बडा मस्खरा होता है वही मीना उनकी जीवनसंगिनी बन गई. ती दुर्दैवाने अनारकली बनू शकली नाही पण कमाल अमरोहींके दिल की मलिका बन गई. कमाल अमरोही या ‘महल’ चित्रपट दिग्दर्शकाच्या प्रेमात पडून १४ फेब्रुवारी १९५२ ला तिने गुपचूप लग्न केलं वडिलांना नकळत. बैजू बावरा प्रदर्शित झाला अन तेव्हाच तिच्या वडिलांना त्यांच्या लग्नाबद्दल कळलं. १९ वर्षांच्या मीनाने ३४ वर्षाच्या कमाल अमरोहींशी लग्न केले होते. अमरोहींचे याआधी लग्नही झाले होते म्हणुनच तिच्या वडिलांना हे लग्न पटले नाही. वडिलांशी भांडून ती बाहेर पडली ते थेट कमाल अमरोहींच्या घरी गेली.

     त्यानंतर १९५३ साली बिमल रॉय यांचा ‘परिणीता’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात ललिताचा अभिनय तिने सहजसुंदर केला. मीनाकुमारीचा परिणीता चित्रपट पाहिल्यावर वाटतं की, शरदचंद्र लेखकांनी तिला पाहूनच आपल्या कादंबरीची रूपरेषा तयार केली असावी. त्यासाठी तिला अभिनयाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘बंदिश, मेमसाब, इल्जाम, चांदनी चौक, आजाद, शतरंज, एकही रास्ता, हलाकू ’ असे अनेक चित्रपट तिच्या नावावर जमा झाले. ‘आजाद’ हा १९५५ सालातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला. त्यातील ‘राधा ना बोले, कितना हंसी है मौसम, अपलम चपलम’ ही गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली. आजाद मध्ये तिचा हिरो ट्रेजेडी किंग दिलीपकुमार होता. या चित्रपटात मीनाने कॉमेडी अभिनयही सहजसुंदर केला होता. त्यानंतरच १९५७ च्या ‘शारदा’ या एल.व्ही. प्रसाद यांच्या चित्रपटाने मीनाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तिच्या बरोबर राजकपूर नायक होता. जो श्री ४२० व आवारा मुळे रशियन जनतेका लडका हिंदी हिरो बनला होता. या वर्षीच मिनाचा ‘मिस मेरी’ सुद्धा खूप गाजला. त्यानंतर १९५८ चे ‘यहुदी, सहारा, फरिश्ता’ हे चित्रपट झाले. १९६० च्या दशकात तिचे ‘कोहिनूर, दिल अपना और प्रीत पराई, चिराग कहां रोशनी कहां, जिंदगी और ख्वाब, भाभी की चूडीयां, मै चूप रहूंगी, आरती, सांज और सवेरा, गजल, चित्रलेखा, बेनझीर’ हेही चित्रपट गाजले. १९६१ साली ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटात छोटी बहूच्या भूमिकेत ती एक व्यसनी स्त्री दाखवली होती. ती भूमिका तिच्या नसानसांत भिनली असं म्हणतात. मीनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे ‘साहिब बीबी और गुलाम’. हा गुरुदत्त यांचा चित्रपट. यात मीनाकुमारीची भूमिका छोटी बहू ची बंगाली कुटुंबातली. पण ती पतीला आपलेसे करण्यासाठी मद्याच्या आहारी जाते. नेमका प्रत्यक्ष आयुष्यातही मीना व्यसनाच्या आहारी गेली. त्यामुळे पतीपत्नीत मतभेद वाढू लागले. कारण त्यांना मद्यपान आवडत नसे. तिचे चित्रपटात काम करणेही अमरोहीना खटकत होते.

 

कमाल अमरोही व तिच्यात वाद होते तरीही त्यांनी मीनाला नजरेसमोर ठेवून ‘पाकीजा’ चित्रपटाची पटकथा तयार केली व शूटिंग सुरु झाले. पाकिजा चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी मध्य प्रदेशच्या जंगलात शूटिंग होते त्यावेळी एक प्रसंग घडला त्यावेळचा एक बदनाम डाकू अमृतलाल आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना घेरले आणि सरदारासमोर उभं केलं. अमरोहींचा महल चित्रपट पाहून प्रभावित झालेल्या त्या सरदाराने सर्वांना सोडून दिलं आणि मीना कुमारीच्या हाताने स्वत:च्या मनगटावर एम शब्द लिहून घेतला. जोपर्यंत ती पत्नी म्हणून कमाल अमरोहींकडे रहात होती तोपर्यंत तिने आपल्या प्रतिष्ठेला आणि अभिनयाला उच्च दर्जा प्राप्त करून दिला होता. पण मतभेदामुळे तिने कमाल अमरोहींचे घर सोडले. कमाल अमरोहींचं घर सोडल्यावर मीना जानकी कुटीर येथे राहू लागली. जानकी कुटीर म्हणजे जिथे महात्मा गांधी येऊन रहात. तिथे शांती मिळवण्यासाठी ती राहू लागली.तिने लिहून ठेवलंय…..

‘ दर्द मेरे बचपनका साथी है l दु:ख झेला, तबाही देखी, कांटो भरी जिंदगीसे भला कैसे दामन छुडा लेती l

मैं हमेशा अपने आपसे लडती रही l मैं किसीको कसूरदार नही ठहराऊंगी l कसूर वक्त का है जिसने मेरे साथ मजाक किया l ’ 

     त्यानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या धर्मेंद्रशी तिचे घनिष्ट स्नेहसंबंध फुलले आणि तिने ‘काजल, पूर्णिमा, चंदन का पलना, बहारोंकी मंझील, मंझली दिदी, मैं भी लडकी हूं, फूल और पत्थर’ असे सात चित्रपट त्याच्यासोबत केले. धर्मेंद्र तर म्हणत असे की, ‘मला मीनाने अभिनयातले बारकावे शिकवले.’ या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ या विचाराप्रमाणे या नायिकेचा जीवनप्रवास वाटतो. मीनाकुमारीचं वाचन अफाट होतं. जिगर मुरादाबादी, साहीर लुधियानवी, फैज अहमद फैज, सरदार जाफरी, शैलेंद्र , हसरत जयपुरी, शकील बदायुनी अशा असंख्य नामवंत कवींच्या गझल, शेर-शायरी आणि कविता तिनं वाचल्या होत्या. सुरेखशा गझला स्वत: शब्दबद्ध केल्या होत्या. सेटवर इतरांशी गप्पा टप्पा न करता गझल, शेर-शायरी यांत ती मन रमवायची.

     ‘ टुकडे टुकडे दिन बीता, धज्जी धज्जी रात मिली

     जिसका जितना आंचल था,उतनी ही सौगात मिली ’

    ‘ सब तुमको बुलाते हैं, पलभर को तुम आ जाओ

         बंद होती मेरी आंखे में मुहब्बत का इक ख्वाब सजाओ ’

तिच्यात उर्दू शायराप्रमाणे भावनात्मकता होती तर नृत्य, संगीत, अभिनय अशा कलासह ती अदाकाराही होती. ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हमने तो जब कलीयां मांगी काटों का हार मिला ’या साहीरच्या काव्यपंक्तीप्रमाणे तिची मनोव्यथा होती. ती दानशूरपणाबद्दल सिनेसृष्टीत मशहूर होती. तिच्याकडं गरजू लोक पैसे मागत. ती कोणालाही निराश करत नसे. निरनिराळ्या स्टुडीओतील कर्मचारी, कामगार, स्पॉटबॉईज यांना ती मदत करत असे. तिचा प्रत्येक चित्रपट यशस्वी होत होता. पण व्यसनामुळे तिच्या ओजस्वी आणि उन्नत अभिनेत्रीची आकाशाला भिडू पाहणारी कारकीर्द अचानक ताऱ्यांसारखी तुटून अनंत अवकाशात लुप्त झाली. तिच्या अखेरच्या काळातले चित्रपट ‘ मेरे अपने, दुश्मन, गोमती के किनारे ’ यात तिची ढासळलेली प्रकृती, म्लान चेहरा दिसतो पण डोळ्यातील हावभाव, अभिनय मात्र बावनकशी होता. तिच्या आवाजात एक दर्द होता. एक कशिश होता, एक खिंचाव होता. पडद्यावर अभिनय न करता ते पात्र, ती भूमिका ती प्रत्यक्ष जगत असे. ही तिची खासियत होती.

छोटया मोठयांचा आदर करणं आणि अभिमानाचा लवलेश नसणं या दोन वैशिष्टयपूर्ण गोष्टी तिच्यात होत्या. ती डोळ्यानं बोलत असे, जिथे शब्दांच मूल्य शून्य असे. तिच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द, तिचा आवाज आणि चेहऱ्यावरील भाव असे असत की, जणू शब्द आणि भाव तिच्याकडेच भिक मागत असत की, आम्हाला पूर्णता दे. तिच्या हास्यात पहाडातल्या झऱ्यासारखे संगीत असे. एकदा स्टुडीओमधील एका मेकअप रूममध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मीना आपल्या पसंतीच्या काचेच्या बांगडया घालत होती. तिचे हात मेहंदीने रंगले होते. मेहंदीकडे पाहत तिनं स्वत:ची एक शायरी म्हंटली, ‘मेरी जिंदगी भी मेहंदी की तरह है पर मेरा प्रिय कहां है जिनके हाथोंमें मैं हमेशा हमेशा के लिए रच जाऊं – मिट जाऊं l’ तिला सुगंधी अत्तराची फार आवड होती. व्यसनाच्या आधीन झाल्यावर ती म्हणायची, ‘ आज शराब को मैं चूम रही हूं और वह भी मुझे प्यारसे चूम रही हैं l शराब आदमी की तरह बेवफा नही होती l’ तिला पान खायची फार आवड होती. याबद्दल तिला कोणीतरी विचारले,तव्हा ती म्हणाली, ‘ यह तो कुछ भी नही है l जिंदगी की तल्खियोंके पान तो मै दिन रात चबाती हूं l’ तिचे आवडते दोनच रंग एक पांढरा आणि दुसरा काळा. बाकी सर्व रंगाना ती मिलावट, भेसळ समजून नफरत करत असे. तिला वाटे इतर सर्व रंगाप्रमाणे आपल्या सभोवती फक्त मिलावटच आहे. एकदा पत्रकारांनी तिला विचारले की,आपको ख्वाब आते है? तेव्हा ती म्हणाली, ‘जिंदगी ही खाव्ब है l जिसे आप हकीकत समझ रहे है वह भी ख्वाब हैं l’

गुलजारनी मीनाकुमारीबद्दल लिहिलं होतं

          शहतूत की शाखपर बैठी मीना बुनती है रेशम के धागे

           अपने ही धागों की कैदी,रेशम की यह शायर इक दिन

           अपनेही धागोमें घुटकर मर जायेगी

आणि हे खरंच होतं.त्यावर ती म्हणत असे, ‘मेरी सबसे बडी कमजोरी है प्यार  l यही मेरी सबसे बडी ताकद है l शायद ये पैदायशी प्यास है l’ पण याच प्रेमानं तिला दर्द शिवाय काहीच बहाल केलं नाही.तिनं स्वत: आपल्या संस्मरणात लिहलं आहे, ‘ प्यार मेरे लिए मृगमरीचिका ही रहा l मैं मंजिल पर पहुंच गयी और अचानक मेरी मंजिल ढह गयी l  मेरे घाव गहरे होते गए और मैं यह चाहने लगी की वे घाव और अधिक गहरे हो जाए l ’

मीनाकुमारी प्रतिभासंपन्न कवयित्री होती. तिच्या लेखनातली दुखरी सल, वैफल्यता मनावर वार करते. तिनं ज्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा केली तिथं तिला निराश व्हायला लागलं, तेव्हा ती म्हणते,

        ‘ मैं जिंदगीको देती रही अपना खूने दिल

           खुद मेरी जिंदगीने मगर क्या दिया मुझे

         मेरे ही ख्वाब मेरे लिए जहर बन गये

           मेरे तसवुरात ने ही डस लिया मुझे ’

अपेक्षाभंगाचं दु:ख, आपल्याच माणसांनी दिलेले धोके,जीवनाबद्दलची अतृप्तता तिच्या काव्यातून प्रतिबिंबित होते. अभिनयासोबतच अल्लाने तिला मुक्त हस्ताने प्रतिभा दिली होती. तिच्या शायरीतील शब्दाप्रमाणे ती आचार विचारांशी बांधील राहिली असती तर इतिहासाचं सुवर्णपान तिच्यासाठी तयार झालं असतं. तिची सूनी गोद हे तिच्या दु:खाच एक कारण होतं. ते तिचे दु:ख तिच्या अभिनयातून उभरलं. ही जीवनाची विडंबना होती की, वह सदा दुसरोंके लिए प्यार की रोशनी रही पर वह ऐसी रोशनी थी जिसके आसपास अंधेरा ही अंधेरा था l

     ती रोज डायरी लिहायची. २ जानेवारी १९६९ च्या पानावर ती लिहते….

        ‘ कुछ नही लिखा l मुद्दत गुजरी l लेकीन सहेली से नाराजगी देखी नही जाती  l आह ! आहिस्ता आहिस्ता सब कह डालो l एक एहसास है की जो सोने नही देता l जगाए रखता है l इस एहसास का नाम क्या है पता नही मिलता l लगता है जैसे सात आसमान जितनी उंची इमारत की मुंडेर पर कोई

दिनों के पृष्ठ लिए बैठा है; l और एक एक करके उडा रहा है l और नीचे खडी एक लडकी भाग भागकर अपने दिन जमा करती है l यानी रात की खामोशी में बैठकर दिन का अहसास लिखती है l सारे शब्द हाफ रहें है l सारी पंक्तिया कांप रही है l सारे अक्षर उसासे भर रहे है l थकन,थकन,थकन, इस थकन का नाम कही ‘अल्लाह है कहीं ‘खुदा’ कहा ‘यारब’ और कहीं केवल ‘आह’ l

     कभी ऐसे पुरसुकून लम्हात (शांतीपूर्ण) भी आएंगे जब मै भी उसी तरह सो जाऊंगी

  वह खामोशी कितनी सुहानी होगी मौत के बाद,

     ४ मे १९६९ च्या पानावर ती लिहते…. ..

तारीखोने बदलना छोड दिया है आह! और जैसे सचमुच ही दिन रुक गए l सुरज निकला नहीं और रात को दिन का नाम नहीं मिला l समय जैसे थम गया l रातोंमें सितारे नहीं थे और दिन में फूल गुम थे l जिस्म बस्स उम्र की धूल उडाता रहा l

     मीनाकुमारीबद्दल असं म्हणत की, मीनाकुमारी की कलाम की हर पंक्तिमें दर्द का एक दरिया लगातार बहता चला जाता है और हर पढनेवाले होठोंपर आह के जुमले सजाता जाता है l

जैसे की, जिंदगी आंख से टपका हुआ बेरंग कतरा l तेरे दामन की पनाह पाता तो आंसू होता l

     १९६४ पर्यंत पाकीजाचे जेवढे शूटिंग झाले होते त्याच्या पुढचे शूटिंग न झाल्याने पाकीजा चित्रपट रखडला आणि नंतर दिलजमाई होऊन ती पुन्हा त्यांच्याकडे रहायला गेली म्हणूनच अनेक वर्षे बंद पडलेला ‘पाकीजा’ पुन्हा सुरु झाला अन पूर्णतेला गेला. ४ फेब्रुवारी १९७२ ला पाकीजा चित्रपटाच विशेष आयोजन केले गेले. मीनाने स्वत:ची फिल्म पाहीली तेव्हा ती खूप संतुष्ट झाली.याच दरम्यान तिचं निधन झालं आणि ‘पाकीजा’ प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला. कमाल अमरोहींचा पाकीजा पूर्ण होणे ही नियतीची इच्छा होती म्हणूनच मीनाची त्यांच्याशी दिलजमाई झाली आणि तिच्या हातून पाकीजा पूर्णत्वाला गेला. ३१ मार्च १९७२ रोजी ही ट्रेजिडी क्वीन तिच्या लाखो चाहत्यांना दु:खात टाकून अल्लाला प्यारी झाली. पण कमाल अमरोही मात्र म्हणाले, ‘मेरी पाकीजा अमर हो गयी, पाकीजा मर नहीं सकती l’ अपनी कलाकी चरमसीमापर पहुंच कर मीनाकुमारी सही वक्त मौतकी आगोशमें चली गई l कमाल अमरोहीने पाकीजा बनाकर मीनाकुमारीको अमर कर दिया है l पाकीजा के जरीये उन्होने अपनी मंजो (मीनाकुमारी) की याद को दुनिया-ए-फिल्ममें कुछ इसतरह अमर किया जैसे गंगा ने हिंदुस्थानको l 

     ती गेल्यानंतर तिनं वेळोवेळी इन्कमटैक्स भरला नसलेने तिची मालमत्ता, गाडी व इतर गोष्टी आयकरवाल्यानी जप्त केल्या. याचंही कारण एकच की, तिने आर्थिक व्यवहारात कधीही लक्ष घातले नाही. तिच्या वसीयतनुसार गुलजारना तिच्या २५ खासगी डायऱ्या मिळाल्या. ज्याचे नंतर त्यांनी संकलन केले. तिला वेगवेगळ्या आकारांच्या दगडांचा संग्रह करण्याचा छंद होता. म्हैसूर, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत इतकेच नाही तर पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळचे दगडही तिने संग्रही सुरक्षित ठेवले होते. तेच पत्थर नंतर तिच्या कबरीसाठी लावले गेले.

     लहानपणी लेदर फेस या चित्रपटात चार वर्षाच्या मीनाकुमारीला जमिनीवर पडून मरण्याचा सीन करायचा होता पण आपले स्वच्छ सुंदर कपडे, लांब लांब केस यावर प्रेम करणारी ती छोटी मातीच्या जमिनीवर पडून मरायला तयार नव्हती. ती सारखी म्हणत होती, ‘पहले जमींपर साफसुथरीसी चादर बिछांओ l फिर मै गिरकर मरुंगी l ’ या मुलीला प्रकृतीने एकाच वेळी सुंदरता, सादगी, आकर्षण, बुद्धिमत्ता आणि उच्च दर्जाची अभिनय कला हे गुण उदार हस्ते बहाल केलं होतं.

     मीनाकुमारीचा आदर्श होती मर्लिन मनरो. फक्त मर्लिन अपुऱ्या कपडयात वावरायची अन मीनाकुमारी शालीन भारतीय नारीच्या रुपात अंगभर कपडे घालायची. त्या दोघीतली काही साम्यस्थळ होती. ती हॉलीवूडची चित्रपट क्वीन तर मीनाकुमारी ही बॉलीवूडची चित्रपट क्वीन. दोघीही सुखाच्या शोधात आयुष्यभर तडफडल्या. जे त्या दोघीनांही शेवटपर्यंत गवसलं नाही.दोघीही निद्रानाशानं ग्रस्त अन दोघीही अल्पायुषी. मर्लिन ३६ व्या वर्षी तर मीनाकुमारी ४० व्या वर्षी गेली अन तेही अतिरिक्त व्यसनामुळे.

 मीना एक आंसू था जो बहते बहते जिंदगी के गालसे बहकर मौत के दामनमें गिर गया l वह एक आह थी जो अनगिनत सांसोमें बंट कर आखिर निकल ही गई l वह एक दर्द था जिसने माटीका लिबास पहन लिया और कितने भावों को उसने रूप दिया था l

      ‘ रोशनी बुझ गयी, हर तरफ अंधेरे की फिजा छा गयी

       आंस का टिमटिमाता हुआ एक दिया

       मुद्दतों आंधियोमें भी जलता रहा और लुटाता रहा

       वक्त की अंधेरी और संकरी राहोंमें प्रकाश

       जगमगाती रही दिल की विरानियां……’

अपनेही दिल से गुनगुनाती हुई इस नज्म से उन्होने अपने आपही अपनी मजारपर फूल चढा दिये थे l

मीनाकुमारी इक हंसी खाव्ब था अदाकारीका जो टूटा  कुछ इसतरह जैसे किसी दरीयासे किनारा छुटा  

उनके यादोंके फूल आज भी माहौल को सुगंधित किये हूए है l एक ऐसी अमिट खुशबू जिसका अंत नही l

अभिनयकी ऐसी महक जो अद्वितीय है l

               एक उदासीका नाम था प्यासी शाम

       मीना तुझे दर्द की देवी कहूं या खाली जाम

       करूण रसकी रसवंती,फुलोंकी रानी को कांटों का सलाम

      खुदा तुझे जन्नत बख्शे मीना तुझे आखरी सलाम…

 

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

1 Comment

  • Rujuta gurav
    On August 1, 2021 7:25 pm 0Likes

    अतिशय अभ्यासपूर्ण लेख.,,🙏

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.