-धनंजय कुलकर्णी 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Overview of Yesteryear’s Singer Actress Malika-e-Tarannum Noor Jehan’s  Life and Career in Pakistan after 1947. भारतीय चित्रपट संगीतातील नूरजहाँ या गायक अभिनेत्री चे योगदान खूप मोठे आहे. चाळीसच्या दशकात अवघ्या सात-आठ वर्षात तिने भारतीय रसिकांना आपल्या स्वराने मोहन टाकले होते. खानदान, दोस्त, झीनत, गाव की गोरी ,बडी मां आणि जुगनू या चित्रपटातून तिने अभिनय आणि गायन या दोन्ही बाजू सांभाळल्या  होत्या. ‘जवां है मुहोब्बत हंसी है जमाना ‘, ‘आवाज दे कहां है दुनिया मेरी जवां है….’ या तिच्या गाण्याने तर रसिक दिवाने झाले होते. तिच्या स्वरात एक नशा होती. मादकता होती, मदमस्तपणा होता. अभिनयातील पडती बाजू तिचा स्वर सांभाळून घेत होता. पण 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सारीच गणित बदलली. भारताची फाळणी झाली. या फाळणीनंतर अनेक मुस्लिम कलाकार पाकिस्तानात निघून गेले; त्यात नूरजहाँ देखील होती.

‘ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीत मर्तिक व्हावं’ अशी इच्छा असणं स्वाभाविक असतं. नूरजहाँचा जन्म पाकिस्तानातील पंजाब मध्ये झाला होता. त्यामुळे ‘जहां पैदा हुई वही जाऊंगी’ असं म्हणत तिने भारत देश सोडला. पुरती सात- आठ वर्षाची तिची भारतातील कारकीर्द पण रसिक तिच्या स्वराला विसरले नाहीत. पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर नूरजहाँ त्या स्वराचे काय झाले? तिच्या अभिनयाचे काय झाले? याबाबत इथल्या रसिकांना कायम कुतूहल असायचे. नूरजहाँ चा भारतीय सिनेमात संगीतातील अकाली अस्त  आणि त्याचवेळी लता मंगेशकर च्या स्वरात झालेला उदय या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण होत्या. लता आणि नूरजहाँ यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से /बऱ्याच दंतकथा रसिक आवडीने ऐकत होते. पण पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर नूरजहाँ च्या कला कारकिर्दीबद्दल फार काही लिहिलं गेलं नाही. लिहिलं गेलं ते तिच्या पाकिस्तानातील बेताल वागणुकीबद्दल, कपडे बदलावेत तसे नवरे बदलण्याच्या तिच्या कृतीवर, पाकिस्तानातील उच्चपदस्थ मंडळीसोबतच्या तिच्या जवळीकीबद्दल. पण सिनेमाच्या क्षेत्रातील तिच्या कामाबाबत फार कमी बातम्या येत राहिल्या.

Noor Jehan
Noor Jehan

आज आपण नूरजहाँ च्या पाकिस्तानमधील म्युझिकल करिअर बद्दल जाणून घेऊयात. ती पाकिस्तानात गेल्यानंतर तिकडे पहिली तीन चार वर्षे खूप गोंधळाची परिस्थिती होती. लाहोर म्हणजेच लॉलीवूड एकेकाळी चित्रपट निर्मितीचे मोठे क्षेत्र होते. पण फाळणी नंतर अनेक स्टुडिओची नासधूस झाली अनेक कलाकार परागंदा झाले. त्यामुळे पाकिस्तान मध्ये चित्रपट निर्मिती जवळपास थांबल्यासारखी झाली. पण १९५१ सालापासून पाकिस्तानात पुन्हा चित्रपट निर्मितीचे पडघम वाजू लागले. नूरजहाँचे शौहर (पती) सय्यद शौकत हुसेन रिजवी यांनी चित्रपट निर्मितीचा घाट घातला. लाहोरच्या शहानुर स्टुडिओमध्ये ‘नगीना’ या उर्दू भाषिक चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. परंतु त्याच वेळी चित्रपट निर्माते नजीर आणि त्यांची पत्नी स्वर्णलता यांनी रिजवी यांना उर्दू पेक्षा पंजाबी भाषेत चित्रपट निर्मिती केली तर अधिक फायदेशीर ठरेल असा सल्ला दिला. त्यामुळे रिझवी यांनी ‘नगीना’ हा चित्रपट अर्धवट ठेवून ‘चनवे’ हा चित्रपट सुरू केला. पंजाबी भाषेतील हा चित्रपट पाकिस्तानात सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा संगीत ‘जुगनू’ या चित्रपटाचे संगीतकार फिरोज  निजामी हे होते. ते देखील पाकिस्तानात गेले होते.

 या चित्रपटातील नूरजहाँ यांनी गायलेले ‘तेरे मुखडे दा काला काला तील वे..’ हे गाणं जबरदस्त लोकप्रिय ठरलं. यानंतर १९५२ साली ‘दुपट्टा’ हा चित्रपटदेखील फिरोज निजामी यांच्या संगीताने गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सय्यद फजली यांनी केले होते. हा चित्रपट त्या काळी भारतात देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नूरजहाँ च्या ‘सावरिया तोहे कोई पुकारे’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले. या गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की १९५२ सालच्या ‘परासक्ती’ या तमिळ चित्रपटातील एका गाण्याला वापरली गेली!  या चित्रपटातील ‘चांदनी राते…’ हे तिने गायलेलं गाणं दखील खूप गाजले. नूरजहाँ यांनी पाकिस्तान मध्ये पंजाबी भाषेत गायलेल्या गाण्यांना  कायम मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या स्वरातील स्फटिका सारखा स्पष्ट खणखणीत पणा गाण्यांना चार चाँद लावत असे.

१९५५ सालच्या ‘फते खान’ या चित्रपटातील गाणी ऐकून संगीतकार ओ पी नय्यर यांनी ‘लाहोर च्या आठवणीने माझे डोळे भरून आले’ असं सांगितलं होतं. १९५६ साली नूरजहाँ पाकिस्तानातील त्या काळातील दोन मोठे संगीतकार जीएस चिस्ती यांच्या ‘लख्त-ए-जिगर’ आणि संगीतकार ख्वाजा खुर्शीद अन्वर यांच्या ‘इंतजार’ या चित्रपटासाठी गायन केले. ‘लख्त-ए-जिगर’ हा चित्रपट आपल्याकडील गीताबाली आणि बलराज सहानी यांच्या ‘वचन’ या चित्रपटाच्या कथानकावर आधारित होता. या चित्रपटातील ‘वो ख्वाब सुहाना टूट गया’, ‘हाल देख ले मेरा’ आणि ‘चंदा की नगरी से’ ही गाणी खूप गाजली. ‘इंतजार’ हा चित्रपट मसूद परवेज यांनी दिग्दर्शित केला होता यात नूरजहाने  एका अंध गायिकेचा रोल केला होता. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला यातील ‘चांद हसे दुनिया बसे’, ‘आभी जाओ जानेवाले’ आणि ‘जिस दिन से पिया दिल ले गये’ या चित्रपटाच्या भूमिकेसाठी नूरजहाँ ला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाले.

लता मंगेशकर यांना ‘इंतजार’ या चित्रपटातील गाणी प्रचंड आवडत असे . 1959 साली  आलेला ‘कोयल’ हा नूरजहान चा अभिनेत्री म्हणून शेवटचा हिट सिनेमा ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मसूद परवेज यांनी केले होते. लहानपणी प्रेमात पडलेले दोघे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकमेकाला भेटतात आणि पुन्हा प्रेमात पडतात असं काहीसं कथानक होतं. संगीतकार खुर्शिद अंवर यांच्यासोबत नूरजहाँ यांनी केलेली गाणी त्याकाळी पाकिस्तानात खूप लोकप्रिय होत होती.

1959 सली नुरजहा दुसरे लग्न केले. तिचा नवरा अभिनेता एजाज दुरानी हा तिच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान होता. दुरानी हिने नूर जहान ने आता अभिनय करू नये अशी अट घातली होती त्यामुळे नवऱ्याने यापुढे आपले लक्ष फक्त पार्श्वगायना वर केंद्रित केले त्यामुळे. 1961 साली आलेला ‘मिर्झा गालिब’ हा तिचा अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. 1960 झाली ‘सलमा’ या चित्रपटातील ‘जिंदगी है या किसी का इंतजार’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले त्याकाळी इतर गायकांना जेव्हा एका गाण्यासाठी 350 रुपये मिळत होते त्यावेळी नूरजहाँ ला मात्र एका गाण्यासाठी दोन हजार रुपये मिळत होते!

तिचा पूर्वाश्रमीचा नवरा शौकत रिजवी यांच्या ‘जाने बहार’ या चित्रपटात तिने संगीतकार राशीद अत्रे यांच्याकडे काही चांगली गाणी गायली होती. ‘कैसा नसीब लाई थी’ आणि ‘ना आंसू बहे’ हि गाणी त्याकाळी पाकिस्तानातील तरूणाईच्या ओठी खेळत होती. राशीद अत्रे या संगीतकाराकडे नूर जहान ने ‘मुझसे पहलीसी मुहोब्बत मेरे मेहबूब न मांग…’हि महान शायर फैझ अहमद फैझ यांची रचना गायली आणि प्रचंड लोकप्रिय ठरली. नुरजहा चे ते सिग्नेचर सॉंग बनले. कैदी या चित्रपटासाठी हे गीत वापरले गेले. 1982 साली जेव्हा नूरजहाँ फाळणीनंतर पहिल्यांदाच भारतात आली त्यावेळी षण्मुखानंद हॉलमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता Mortal Men Immortal Melodies असं या कार्यक्रमाचं शीर्षक होतं. या कार्यक्रमात नुरजहा ने जी तीन गाणी गायली त्यात यांच्या या गाण्याचा समावेश होता. साठच्या दशकामध्ये अभिनेत्री शमीम आराम हिच्यावर चित्रीत नूरजहाँ ची गाणी खूप गाजत होती.

१९६७ साली साम्यवादी विचाराच्या झिया सरहदी यांनी ‘लाखो में एक’ हा सिनेमा पाक मध्ये बनवला होता त्यातील नुरजहा ची गाणी खूप गाजली. याच सिनेमाच्या कथानाकावरून पुढे राजकपूर यांनी ‘हीना’ हा सिनेमा बनवला. पाकिस्तान मधील सत्तरचे दशक पंजाबी भाषेतील चित्रपटांनी प्रचंड गाजले. सोप्या उडत्या चालीतील  नूरजहाँ गाणी सिनेमे हिट होण्याचे मुख्य कारण बनले. १९७१ मध्ये टोकियो येथे ती अंतराष्ट्रीय संगीत महोत्वात पाकिस्तान चे प्रतिनिधित्व करत उपस्थित होती.

पाकिस्तानातील नूरजहाँ ची कारकीर्द जशी लोकप्रिय होती तशीच काहीशी वादग्रस्त देखील होती. अगदी कपडे बदलावेत तसे ती पुरुष बदलत होती. 1954 साली पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज नझर मोहम्मद (मुदस्सर नझर चे वडील) याच्या ती प्रेमात पडली. त्या दोघांना बेडरुममध्ये ‘नको त्या अवस्थेत’ तिच्या नवऱ्याने बघितले. नझर मोहम्मद याने घाबरून खिडकीतून रस्त्यावर उडी मारली. त्यात तो जायबंदी झाला आणि त्याचे क्रिकेटचे करियरच संपुष्टात आले! शौकत रिजवी यांना घटस्फोट दिल्यानंतर 1959 झाली तिने दुसरे लग्न केले. त्यावेळी तिने शौकत पासून झालेल्या तीन मुलांना स्वतःकडे ठेवले. तिचे दुसरे लग्न हे फार काळ टिकले नाही या नवर्‍यापासून देखील तिला तीन अपत्ये झाली. 1970 साली तिने घटस्फोट घेऊन पाकिस्तानी अभिनेता युसुफ खान याच्या सोबत तिसरे लग्न केले!

Noor Jehan with Mother, Husband Shaukat Hussain Rizvi, Sons Akbar & Asghar Hussain Rizvi via
Noor Jehan with Mother, Husband Shaukat Hussain Rizvi, Sons Akbar & Asghar Hussain Rizvi

पाकिस्तानातील उच्चपदस्थ राजकीय व्यक्ती तसेच लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत देखील नुरजहा चे खुलेआम संबंध होते असं तिथला मीडिया सांगतो. नूरजहाँ असे का वागत होती? याचे उत्तर आपल्याकडील माधव मोहोळकर यांनी लिहिलेल्या ‘गीतयात्री’ या पुस्तकात आपल्याला  सापडते. या पुस्तकातील एका प्रकरणात ते म्हणतात ‘पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर नूरजहाँला ‘मलिका–ए- तरन्नूम’ तसेच ‘मॅडम’ या आदराने संबोधले गेले. तब्बल वीस हजार गाणी तिच्या नावावर आहेत.  पाकिस्तानमध्ये आजवर कुठल्याही महिलेला इतका सन्मान मिळालेला नाही. असे असले तरी वैयक्तिक जीवनात ती अतृप्तच राहिली. तरुण वयात मनावर झालेला फाळणीचा मानसिक आघात कदाचित तिच्या या कृतीला कारणीभूत असावा. कारण संवेदनशील वयात मनाला झालेली ती मोठी जखम होती!’

Noor Jehan
Noor Jehan

नूरजहाँला हृदयविकार 1986 साली लक्षात आला होता. त्यानंतर तिने गाणं कमी केलं. २००० साली रमजानच्या पवित्र महिन्यात तिला कराचीच्या इस्पितळात ऍडमिट करावे लागले आणि तिथेच तिचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले. त्यावेळचे पाकिस्तानचे प्रमुख परवेज मुशर्रफ यांनी लष्करी इतमामात तिचा अंत्यसंस्कार व्हावा असे आदेश दिले. कराची मध्येच तिचा अंतिम विधी पार पाडला यावेळी तब्बल चार लाख चहाते उपस्थित होते! 

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment