‘हौले हौले हो जाएगा प्यार’  हे गीत आदित्य चोप्रा यांच्या एका रफ ट्यून मधून आलं आहे ’: ‘रब ने बना दी जोडी’ चे संगीतकार सलीम-सुलेमान सांगत आहेत. 
आदित्य चोप्रा दिग्दर्शित शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा अभिनीत रब ने बना दी जोडी हा एक ब्लॉकबस्टर होता. आज त्या सिनेमाला १२ वर्षे पूर्ण झाली. या रोमँटिक चित्रपटात वेगवेगळ्या परिस्थितीतून एकत्र आलेल्या व अचानकपणे लग्न ठरलेल्या स्त्री आणि पुरुषाची कहाणी सांगितली गेली होती ज्याच्या अंती ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. चित्रपटाला संगीतकार सलीम आणि सुलेमान या जोडीचे हिट संगीत लाभले होते. चित्रपटाच्या रिलीजच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त सलीम सुलेमान यांनी या गाण्याची जन्मकथा सांगितली. 

गाणं तयार कसं झालं याबद्दल सुलेमान सांगतात, “हा चित्रपट खूपच छान लिहिला गेला होता, कथेत गाण्यांसाठी अचूक जागा आणि स्पॉट्ससह कल्पना दिलेली होती. राज आणि सूरी (शाहरुखची दुहेरी पात्र) या दोन्ही पात्रांची संगीताद्वारे अतिशय वेगळी ओळख असावी अशी अपेक्षा होती. त्यात सुरी एक पारंपारिक पती आहे आणि राज एक शहरी नायक. अगदी सर्वसामान्य माणसाला आवडेल अशी साधी सरळ ट्यून्स अपेक्षित होती जिला ऐकले कि लगेचच आवडावी अशी.

shahrukh and anushka in rab ne bana di jodi

सलीम पुढे म्हणतो, “रब ने बना दी जोडीचे संगीत तयार करणे ही मोठी संधी होती. एक निर्माता म्हणून आम्ही आदी बरोबर चक दे इंडियाआणि आजा नाचले मध्ये काम केले होते पण दिग्दर्शक म्हणून आदी अतिशय वेगळा होता. हा अल्बम आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असावा अशी आमची इच्छा होती परंतु मुख्य म्हणजे त्या संगीतामुळे चित्रपटाला लाभ व्हावा अशी इच्छा होती.”

या सिनेमातील गाण्यांच्या विशेषतेबद्दल बोलताना सलीम म्हणतो, “संगीत अल्बमची सर्वात मोठी यूएसपी ही होती की कथेतील सर्व गाणी जरी वेगवेगळ्या परिस्थितीसाठी तयार केली गेली असली तरी त्यांचा एक समान धागा होता. टी गाणी जणू पात्रांचे प्रतिबिंब होती. कथेतील व गाण्यातील  सुवर्ण मंदिरामुळे चित्रपटाच्या शीर्षक गीतामध्ये भक्ती भाव आणि चिरकाल टीकेल अशी गुणवत्ता जोडली गेली.”

सुलेमान पुढे म्हणाले, “मला वाटते की संगीतात असलेला साधेपणा, पारंपारिकता, गाणी परिचित वाटणे ही संपूर्ण अल्बमची यूएसपी होती. आम्ही हिट गाण्यापेक्षा चांगली गाणी तयार करण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे ही गाणी खास बनली ”

हे फार कमी लोकांना माहीत आहे की ‘हौले हौले हो जाएगा प्यार’ या गाण्याचा मुखडा ही आदित्य चोप्रा यांची ट्यून होती. सुलेमान म्हणतात की, “गाण्याचे बोल खरेतर आदिंनी लिहिलेल्या दृष्यावरून आले होते. ‘तानी पार्टनर हौले हौले हो जाएगा प्यार’ इथे संवाद संपतो. आदी या संवादांना व गीतांना सहजच गुणगुणत बसला होता आणि आम्हाला ते ऐकताच क्षणी आवडले . मग जयदीपने (साहनी) त्यांना अजून व्यवस्थित लिहिले. या गीतांना आम्ही अगदी सहज संगीत देण्याचे ठरवले होते.

shahrukh khan and anushka sharma in rab ne bana di jodi

शाहरुख खानला रोमान्सचा राजा मानले जाते आणि सलीम म्हणतो की ‘सुपरस्टार जेंव्हा त्यांच्या सुंदर गाण्यांना लिप सिंक करतो त्यामुळे ते आणखीन खास बनते’. “एसआरके प्रत्येक गाण्यात मजा आणतो. रब ने हा आमच्यासाठी एक मैलाचा दगड ठरला कारण त्यातील सर्व गाणी चार्टबस्टर ठरली आणि शाहरुख खान हे त्यामागचे एक मोठे कारण आहे. तो खरोखर स्क्रीनवर प्रत्येक गाणे अक्षरशः साजरा करतो आणि त्यांना एव्हरग्रीन बनवितो”

Website | + posts

Leave a comment