विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

दिल्लीच्या माथुर दाम्पत्याला एकूण १० अपत्ये होती. त्यातला मुकेश (Singer Mukesh) हा सहावा. मुकेश ची बहिण सुंदर प्यारी हिला शिकवायला संगीत शिक्षक येवू लागले आणि मुकेश ची गाण्याची आवड वाढायला लागली. दहावी नंतर मुकेश ने शालेय शिक्षण सोडले आणि सरकारी नोकरी करू लागला. या कालखंडात त्याने गाणे शिकायला आणि रेकोर्डिंगचे तंत्र शिकायला सुरुवात केली . मोतीलाल राजवंश हा त्याचा दूरचा नातेवाईक. एका लग्नात त्याने मुकेश ला गाताना ऐकले आणि मुंबईला आणले. पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे गाणे शिकायला पाठवले. इथेच त्याची ओळख राजकपूर बरोबर झाली. राजकपूर पण गाणे शिकायला येत असे. (Remembering Finest Singer of Hindi Cinema Mukesh and his Musical Journey)

याच काळात मुकेश ला एक गायक नटाची भूमिका मिळाली त्या सिनेमाचे नाव होते ‘निर्दोष’ (१९४१). पार्श्वगायक म्हणून १९४५ साली त्याने पहिले गाणे रेकोर्ड केले ‘पहली नजर’ साठी (१९४५ ). संगीतकार होते अनिल विश्वास. या सिनेमाचा निर्माता मजहर खान होता. त्याला हे गाणे पसंत नव्हते आणि सिनेमातून कापून टाकायला सांगितले. पण अनिल विश्वास यांनी विनंती केली म्हणून फक्त एक आठवडाच हे गाणे सिनेमात असेल असे मजहर ने सांगितले. सिनेमा प्रदर्शित झाला आणि लोक भारावून गेले. नक्की हे गाणे सैगल चे आहे अश्या पैजा लागल्या. अशी लोकप्रियता वाढल्यावर सिनेमात गाणे कायम ठेवले गेले. मुकेश वर सुरुवातीला सैगल चा प्रभाव होता. हा कमी करून त्याला त्याच्या शैलीत गायला लावले नौशाद यांनी ‘अंदाज’ मध्ये. गंमत म्हणजे यात मुकेश ची गाणी दिलीप कुमार च्या तोंडी आहेत आणि रफी ची गाणी राजकपूर च्या तोंडी. फिल्म ‘आग’ पासून मुकेश ओळखला गेला तो राजकपूर चा आवाज म्हणून. शंकर जयकिशन यांनी मुकेश च्या आवाजाचा पुरेपूर उपयोग केला. पण नौशाद पासून लक्ष्मीकांत प्यारेलाल पर्यंत मुकेश अनेक संगीतकारांकडे गायला.

Singer Mukesh with Raj kapoor
Singer Mukesh with Raj Kapoor

स्वभावाने अतिशय नम्र असलेल्या मुकेशचा प्रेम विवाह सरला त्रिवेदी बरोबर झाला ( १९४६ ). दोघांच्या घरातून तीव्र विरोध झाला. यांचा संसार टिकणार नाही असे त्याच्या सासर्‍यांना वाटले पण अमेरीकेला जायच्या चार दिवस आधी दोघांच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस साजरा झाला. अतिशय खडतर असा त्यांचा संसार झाला. मुकेश ने सिनेमे निर्माण केले वितरीत केले पण त्यात त्याला जबर फटका बसला. शैलेंद्र च्या ‘तीसरी कसम’ चे मुंबईतले वितरण मुकेश ने केले होते. नादारी जाहीर करावी लागली आणि मुलांना म्युनिसिपाल्टी च्या शाळेत शिक्षण घ्यावे लागले. जेव्हा राजकपूर साठी मुकेश गायचा तेव्हा त्याला ५०० रुपये मिळायचे आणि इतरांसाठी गायचा तेव्हा ३००. त्याला त्याच्या आवाजाच्या मर्यादा माहित होत्या. म्हणून किती तरी वेळा त्यानेच मन्ना डे चे नाव सुचविले. राजकपूर चा जिवलग मित्र. राजकपूर ला अनेक वेळा धीर देवून अडचणीतून बाहेर काढायचा. वैजयंती माला नावाच्या वादळाने राजकपूरचे घर उध्वस्त केले तेंव्हा रोज मुकेश कृष्णा भाभी यांची समजूत काढायला जात होता. त्याची गाणी तर आपल्या काळजात घट्ट बसलेली आहेत. हृदयाला स्पर्शणारा त्याचा अनुनासिक स्वर कधीच विसरता येणार नाही.

Singer Mukesh with Raj kapoor
Singer Mukesh with Raj kapoor

‘कल आज और कल’ नंतर शंकर जयकिशन यांचे आर के फिल्म्स मधले मधुर संगीत संपले. राजकपूर सुद्धा नायकाच्या भूमिकेतून बाजूला झाला आणि मुकेश मागे पडत गेला. ‘बॉबी’ च्या वेळी शैलेंद्र सिंग आर के मध्ये आला. यानंतर राजकपूर ने ‘सत्यम शिवम सुंदरम’ सेट वर नेला आणि मुकेश अस्वस्थ झाला. तो कृष्णा भाभी कडे गेला आणि तिला मध्यस्ती करायला सांगितली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच कृष्णा ने राजकपूर ला सांगितले आणि मुकेश साठी गाण्याचे रेकाॅर्डिंग ठरले. राजकपूरचा आणि त्याचा असा रिवाज होता की रेकाॅर्डिंग नंतर खास व्हिस्की ची बाटली मागवली जायची आणि मग दोघे त्याचा आस्वाद घ्यायचे. पण रेकाॅर्डिंग लांबले आणि सकाळच्या विमानाने मुकेश अमेरिका दौऱ्यावर गेला आणि ती बाटली तशीच राहिली.

डेट्राॅईट ला कार्यक्रम सादर करताच मुकेश गेला. ज्या दिवशी त्याचे पार्थिव भारतात आणले त्याच विमानाचे त्याचे परतीचे तिकीट होते. राजकपूर च्या शब्दात सांगायचे म्हणजे जाताना पॅसेंजर म्हणून गेलेला मुकेश येताना लगेज मधून आला. स्वभावाने अतिशय विनम्र होता. आपल्या आवाजाच्या मर्यादा जाणून होता.

या आमच्या पिढीच्या या महान गायकाला ही छोटीसी आदरांजली. 

हेही वाचा – ये कैसी अजब दास्ताँ हो गयी …सज्जाद हुसैन

हिंदी सिनेमाच्या जुन्या जमान्यावरील लेखांसाठी क्लिक करा  

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.