– विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

हिमांशू रॉय वारले. देविकाराणी आणि तिच्या कंपू ने काही काळ Bombay Talkies ही संस्था सुरु ठेवली. पण लवकरच तिचे दिवाळे निघाले. मग अशोक कुमार, सावक वाच्छा यांनी भागीदारित ही संस्था चालवायला घेतली. नवीन सिनेमासाठी एका चांगल्या कथेच्या शोधात असतानाच सैय्यद हैदर नावाचा एक तरुण लेखक अशोकुमार यांना भेटला, त्याच्याकडे एक गूढ़ कथा होती. अशोक कुमार यांना ही कथा खूप आवडली. त्यानी या कथेवर सिनेमा तयार करायचा निर्णय घेतला. सैय्यद हैदर नी एक अट घातली की दिग्दर्शन पण मीच करणार. अशोक कुमार यानी ही अट मान्य केली. (Behind the Scenes Making of Aayega Aanewala Song by Music Director Khemchand Prakash from the film Mahal)
Mahal film poster
Mahal Film Poster; Courtesy: NFAI

सैय्यद हैदर म्हणजेच कमाल अमरोही. यांसाठी त्यांनी मधुबाला ची केलेली निवड जी सावक वाच्छा आणि इतरांना फारशी पटली नव्हती कारण नव्या सिनेमासाठी सुरैय्याला ४० हजार रुपये देऊन करारबद्ध केले होते. यासाठी मधुबालाच्या स्क्रीन टेस्टच्या वेळी खराब प्रकाश योजना करून तिला नापास केले. कमाल अमरोही भडकले व त्यांनी अशोककुमार यांच्याकडे तक्रार केली. परत स्क्रीन टेस्ट घ्यायच्या वेळी स्वतः कमाल अमरोही यांनी प्रकाशयोजना केली. स्क्रीन टेस्ट उत्तम झाल्यावर बाकीच्याचा आवाज बंद झाला आणि सुरैय्याला दिलेली रक्कम परत मागून मधुबालाच नायिका म्हणून निवडली गेली. खेमचंद्र प्रकाश यांच्याकडे संगीताची जबाबदारी दिली. गीते लिहायला नक्षब यांना बोलावले. नक्षब यांनी एक गीत लिहिले पण सुरवातीच्या ओळी मनासारख्या जमत नव्हत्या. एका रात्री झोपेत कमाल अमरोही यांना सुचले “आयेगा आयेगा आयेगा आनेवाला”. या गाण्याच्या सुरवातीचे शब्द ज्याला Ad lib म्हणतात ते कमाल अमरोही यांनी लिहिलेले आहे. गाण्याला लावलेली अप्रतिम चाल अशोक कुमार यांना आवडली आणि लतादीदींच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करायचे ठरले.

त्या वेळी साऊंड रेकॉर्डींग प्राथमिक अवस्थेत असे. आवाजाचा चढ उतार करायची सोय मशीन मध्ये नसायची. या साठी रेकॉर्डींग च्या वेळी लतादीदींना लांबून गात गात स्टुडियोत यायला सांगितले. जवळजवळ रात्रभर रिहर्सल केल्यावरच सकाळी रेकॉर्डींग सुरु झाले. तो पर्यंत Ad lib हा प्रकारच माहित नसल्यामुळे साऊंड रेकॉर्डीस्ट सावक वाच्छा वैतागले आणि ओरडले ‘क्या बकवास लगाया है? कोई आनेवाला है तो जल्दी बुलाव.’ खेमचंद्र प्रकाश नाराज झाले आणि स्टुडियोच्या बाहेर निघून गेले. अशोककुमार यांनी त्यांची समजूत घातली आणि हे गाणे रेकॉर्ड झाले. या सिनेमाने आणि गाण्याने इतिहास घडवला. इथूनच सुरु झालेला संगीताचा सुरेल प्रवास पाहायला मात्र खेमचंद्र प्रकाश नव्हते. हा सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच ते या जगातून गेले. आज त्यांची पुण्यतिथी.

लतादीदींचा अपवाद सोडल्यास या सिनेमाशी संबंधित कोणीच हयात नाही. पण रसिकांच्या मनात हे गाणे कायमच राहील.

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.