– डॉ. प्रकाश ग. कामत, पुणे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

81 Hindi Films Having same name and in both the films Lata Mangeshkar has given her golden voice. Article written by film scholar Dr. Prakash Kamat on the occasion of Lata Mangeshkar’s 81st Birthday for the 2009 Lata Mangeshkar Special Issue of Navrang Ruperi.  लता मंगेशकर यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपट अभ्यासक डॉ प्रकाश कामात यांनी नवरंग रुपेरी च्या २००९ सालच्या लता मंगेशकर विशेषांकासाठी लिहिलेला लेख.  
नुकतेच त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत व 81 व्या वर्षांत यशस्वी पदार्पण केले आहे. गायन क्षेत्रातील त्यांचा उत्साह अद्यापि पूर्ववतच आहे. त्यामुळेच की काय लताजी हे संगीताला मिळालेले देणे आहे, असे म्हणावसे वाटते. अनेकांना ही गोष्ट नवीन असेल की, हिंदीतील एकाच नावाचे दोन (वेगवेगळे) चित्रपट (त्यांचे संगीतकारही वेगवेगळे) व या दोन्ही चित्रपटांत लतांचा आवाज… असे त्यांच्या सांगितीक कारकीर्दीत 120 च्या आसपास चित्रपटांद्वारे प्रत्ययास आले. यातील 81 चित्रपटांचा नामनिर्देश करणे प्रसंगाला धरून उचित ठरते.

पुण्यात तब्बल 7 वर्षे, ‘सूरविहार’ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या फक्त मुली व स्त्रियांकरिताच प्रवेश असलेल्या, त्यांच्या हिंदी (व मराठी) गीतांवर आधारित, ‘तेरे सूर – मेरे गीत’ हे समर्पक शीर्षक धारण केलेल्या ‘गीत-गायन’ स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग मला अनेक वेळा आला व प्रत्येक वेळी, कीर्तीच्या शिखरावर आरूढ होऊनही त्याची निगर्वी, साधी राहणी, धार्मिक वृत्ती, चेहर्‍यावरील प्रसन्नता व तेज पाहून मन भारावून जायचे. 1947 सालच्या ‘आपकी सेवा में’ पासून अगदी अलीकडच्या ‘मुहब्बतें’, ‘पुकार’, ‘हम तुमपे मरते हैं…’पर्यंतच्या त्यांच्या हिंदीतील (व इतरही भाषेतील) ‘पार्श्वगायन’रूपी अखंडित 60/62 वर्षांतील सांगितीक प्रवासाचा विचार मनात आससला असता जाणवते ते हे की, गायकाचे वय म्हणजे त्यांच्या स्वरांचे वय. त्यांचा स्वर आजही यौवनात आहे. थोडक्यात, त्यांनी स्वरांचे तारुण्य जपले आहे. त्यातच त्यांचे वेगळेपण निश्चित आहे. म्हणूनच… अलौकिका! लतांनी जरी सर्व प्रकारची गाणी गायलेली असली तरी शांतरस, भक्तिरसच या गळ्याला पोषक आहे व म्हणूनच अभिजात संगीतासाठी ‘लता मंगेशकर’ हे नाव वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके घेतले जाईल.

अनेकांना ही गोष्ट नवीन असेल की, हिंदीतील एकाच नावाचे दोन (वेगवेगळे) चित्रपट (त्यांचे संगीतकारही वेगवेगळे) व या दोन्ही चित्रपटांत लतांचा आवाज… असे त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीत 120 च्या आसपास चित्रपटांद्वारे प्रत्ययास आले. यातील 81 चित्रपटांचा नामनिर्देश करणे प्रसंगाला धरून उचित ठरते. ‘मेरे लाल’ (1948 – संगीतकार एस. पुरुषोत्तम) व ‘66 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘हीर-रांझा’ (48 – सं. अजीज खान) व (70 – सं. मदन मोहन), ‘जिद्दी’ (48 – सं. खेमचंद्र प्रकाश) व (64 – सं. एस. डी. बर्मन), ‘बाजार’ (49 – सं. श्यामसुंदर) व (82 – सं. खय्याम), ‘जीत’ (‘49 – सं. अनिल विश्वास’) व (72 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘किनारा’ (49 – सं. मधुसूदन आचार्य) व (77 – सं. आर. डी. बर्मन), ‘महल’ (49 – सं. खेमचंद प्रकाश) व (69 – सं. कल्याणजी आनंदजी), ‘पारस’ (49 – सं. गुलाम महंमद) व (71 – सं. कल्याणजी आनंदजी), ‘पतंगा’ (49 – सं. सी. रामचंद्र) व (71 – सं. शंकर जयकिशन), ‘राखी’ (49 – सं. हुस्नलाल भगतराम) व (62 – सं. रवि), ‘दीदी’ (48 – सं. मुकुंद मसुरेकर) व (59 – सं. एन. दत्ता), ‘आरजू’ (50 – सं. अनिल विश्वास) व (65 – सं. शंकर – जयकिशन), ‘भाईबहन’ (50 – सं. श्यामसुंदर) व (59 – सं. एन. दत्ता), ‘संग्राम’ (50 – सं. सी. रामचंद्र) व (65 – सं. लाला-असर-सत्तार), ‘वफा’ (50 – सं. विनोद, बुलासी. रानी) व (72 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘अफसाना’ (51 – सं. हुस्नलाल भगतराम) व (66 – सं. चित्रगुप्त), ‘अलबेला’ (51 – सं. सी. रामचंद्र) व (71 – सं. शंकर – जयकिशन), ‘एक नजर’ (51 – सं. एस. डी. बर्मन) व (72 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘बादल’ (51 – सं. शंकर – जयकिशन) व (66 – सं. उषा खन्ना). यातील काही निवडक सुरेल गीत ‘जादू कर गए किसी के नैना’ (48 – ‘जिद्दी’), ‘साजन की गलियाँ छोड चले’ (49 – ‘बाजार’), ‘मस्त पवन है चंचल धारा’ (49 – ‘जीत’), ‘कैसे काटूँ ये काली रातें’ (48 – ‘हीर-रांझा’), ‘जानेवाले ये जवानी चार दिनकी’ (49 – ‘किनारा’), ‘आयेगा आनेवाला’ (49 – ‘महल), ‘इस दर्द की मारी दुनिया में’ (41 – ‘पारस’), ‘दो दिनके लिए मेहमान यहाँ’ (51 – ‘बादल’), 48 सालातील ‘मेरे लाल’पेक्षा 66 सालातील ‘मेरे’, त्यातील लतांच्या आवाजातील, ‘पायलकी झंकार रस्ते रस्ते’ या गाण्यामुळे स्मरणात राहिला, तर इतरही ‘ओ जानेवाले तूने अरमानों की दुनिया लुटली’ (49 – ‘पतंगा’), ‘ओ रूठ जानेवाले मेरा कुसुर क्या है’ (40 – ‘राखी’), ‘कहाँ तक हम उठाएं गम’ (50 – ‘आरजू’) , ‘नजर से नजर जो मिलाई गई है’ (50 – ‘संग्राम’), ‘कागारे जारे जारे’ (50 – ‘वफा’), ‘कहाँ है तू मेरे सपनों के राजा’ (51 – ‘अफसाना’), ‘दिल धडके नजर शरमाए’ (51 – ‘अलबेला’), ‘जा देख लिया तेरा प्यार’ (51 – एस. डी. बर्मन) इ. गीते श्रवणीय निश्चितच आहेत. लतांचा कर्णमधुर आवाज पहाटे जागे झाल्यापासून अगदी रात्री पापण्यांवर झोपेचे ओझे येईपर्यंत प्रत्येकाच्या दिनक्रमाशी कायम सोबत करीत असतो, मग मराठी अभंग किंवा भावगीत असो, हिंदी गजल किंवा लोरी असो, सुरेलपणाची परिसीमा त्यांच्या आवाजात आहे. पा लागू कर… सुरुवातीला हिंदीतून, ‘जीवनयात्रा’, ‘सुभद्रा’ (दोन्हींचे संगीतकार वसंत देसाई) अशा चित्रपटांतून अभिनय करून गीत गाणार्‍या लतांनी. या आधी म्हणजे 1945 सालातील ‘बडी माँ’ (सं. दत्ता कोरगावकर) चित्रपटातही छोटी भूमिका निभावून एक ‘सोलो’ व एक मीनाक्षीबरोबर युगल गीते गायली. या चित्रपटाची नायिका मात्र ‘मलिका-एतरन्नूम’ नूरजहाँ होती, जिच्या लोकप्रिय गाण्यांनी त्या काळात तमाम रसिकांना मुग्ध केले होते. लता-सुरैयाप्रमाणे लता-नूरजहाँ ही जोडी, युगल गीताच्या निमित्ताने एकत्र आली असती (केवळ याच चित्रपटांद्वारे), तर रसिकांच्या दृष्टीने ती पर्वणी ठरली असती! असो.

1947 साली ‘आपकी सेवा में’ (सं. दत्ता डावजेकर) या चित्रपटासाठी लतांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. या चित्रपटात त्यांनी 3 ‘सोलो’ गीते गायिली. त्यातील, ‘पा लागू कर जोरी रे’ हे ठुमरी अंगाचे गीत, ‘पार्श्वगायिका’ म्हणून, त्यांच्या सांगितीक कारकीर्दीतील पहिले पार्श्वगीत म्हणून नोंदवले गेले, जे पडद्यावर चित्रित केले गेले होते. पुण्याच्याच सुप्रसिद्ध नर्तिका रोहिणी भाटे यांच्यावर. याच सुमारास संगीतकार डी. सी. दत्ता यांनी ‘सोना चाँदी’ चित्रपटासाठी लतांकडून. ‘प्यारे बापूकी’ हे गीत गाऊन घेऊन ते ध्वनिमुदित केले. असो. ‘काली घटा’ (51 – सं. शंकर – जयकिशन) व (79 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘नगिना’ (51 – सं. शंकर – जयकिशन’ व (86 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘सौदागर’ (51 – सं. सी. रामचंद्र) व (73 – सं. रवींद्र जैन), ‘जग्गू’ (52 – सं. हंसराज बहल) व (75 – सं. सोनिक ओमी), ‘जाल’ (52 – सं. एस. डी. बर्मन) व (67 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘दाग’ (52 – सं. शंकर – जयकिशन) व (73 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘हंगामा’ (52 – सं. सी. रामचंद्र) व (71 – सं. आर. डी. बर्मन), ‘औरत’ (53 – सं. एस. डी. बर्मन) व (76 – सं. सलील चौधरी), ‘धुआँ’ (53 – सं. वसंत देसाई, धनीराम) व (81 – सं. आर. डी. बर्मन), ‘पतिता’ (53 – सं. शंकर – जयकिशन) व (80 – सं. भप्पी लाहिरी), ‘फरेब’ (53 – सं. अनिल विश्वास) व (83 – सं. भप्पी लाहिरी), ‘बागी’ (53 – सं. मदनमोहन) व (64 – सं. चित्रगुप्त), शहंशाह (53 – सं. एस. डी. बर्मन) व (88 – सं. अमर – उत्पल), ‘नागिन’ (54 – सं. हेमंतकुमार) व (76 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘नोकरी’ (54 – सं. सलील चौधरी) व (79 – सं. आर. डी. बर्मन), ‘परिचय’ (54 – सं. शैलेश मुखर्जी) व (72 – सं. आर. डी. बर्मन), ‘वानगीदाखल’ ‘उनके सितम ने लूट लिया’ (51 – ‘कालीघटा’), ‘तूने हाए मेरे जख्म – ए जिगर को छू लिया’ (51 – ‘नगिना’), ‘बिगड गयी क्यूं मेरी तकदीर बनते बनते’ (51 – ‘सौदागर’), ‘दिलकी दुनिया लूटकर ओ जानेवाले लौट आ’ (52 – ‘जग्गू’), ‘पिघला है सोना दूर गगनपर’ (52 – ‘लाज’), ‘तेरे दरसे खुशी माँगी थी’ (52 – ‘हंगामा’), ‘उल्फत का साज छोडो समाँ सुहाना है’ (53 – ‘औरत’), ‘जिंदगी हमसे हुई है दूर’ (53 – ‘धुआँ’), ‘मोरे मन में समा गए ऐसे पिया’ (53 – ‘फरेब’), ‘करके बदनाम मेरी निंदे हराम’ (53 – ‘बागी’), ‘गम क्यों हो जीनेवालों को जीते जी मरने का’ (53 – ‘शहंशाह’), ‘ओ ऽ मन रे ना गम कर ये आँसू’ (54 – ‘नोकरी’), ‘जलके दिल खाक हुआ’ (54 – ‘परिचय’) इ. गीते रसिकांना वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवतात. ‘दाग’, ‘नागीन’, ‘पतिता’ अशा चित्रपटांतील लतांची गाणी रसिकांच्या चांगल्या परिचयाची आहेत. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो 1953 सालातील सं. एस. डी. बर्मन यांनी संगीत दिलेल्या ‘जीवन ज्योती’ या चित्रपटाचा. यातील ‘छाई करीब दरिया बैरनियाँ’ व ‘सो जारे सोजा मेरी आँखियों के तारे’ ही उत्कृष्ट लोरी चित्रपटासाठी व एच. एम. व्ही. कंपनीसाठी लतांनी तर हीच दोन गीते कोलंबिया कंपनीसाठी आशा भोसलेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली गेली होती. एकच ‘लोरी’, एकाच पद्धतीने; पण या ‘मान्यवर’ भगिनींनी, दोन वेगवेगळ्या ध्वनिमुद्रिका प्रस्तुत करणार्‍या कंपनींसाठी गाणे, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आगळेवेगळे ‘रेकॉर्ड’ ठरायला हरकत नाही. असो.

पार्श्वगायनातील ‘वेगळत्व’ खरे तर, हिंदी चित्रपटांतून, पार्श्वगायन पद्धती सर्वप्रथम, कलकत्त्यातील ‘न्यू थिएटर्स कंपनी’ या चित्रसंस्थेने निर्मित केलेल्या नितीन बोस दिग्दर्शित व सं. आर. सी. बोराल यांनी संगीत दिलेल्या ‘धूपछाँव’ (1935) या चित्रपटाद्वारे व त्यानंतर, ‘सागर मूव्हिटोन’ या चित्रसंस्थेने निर्मित केलेल्या, धीरेन बोस दिग्दर्शित व सं. अनिल विश्वास यांनी संगीत दिलेल्या ‘महागीत’ या चित्रपटाद्वारे मुंबईत प्रस्तुत करण्यात आली. असे असले तरी खर्‍या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘पार्श्वगायन पद्धती अमलात आणली गेली ती 4 थ्या दशकाच्या अगदी सुरुवातीपासूनच, तेही 1941 सालच्या पांचोली आर्टस्च्या ‘खजांची’ (सं. गुलाम हैदर) या चित्रपटातून. या चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय झाल्यामुळे त्याकाळी या चित्रपटातील गाण्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात लतांनी आपला सहभाग दर्शवून वयाच्या 12 व्या वर्षी, प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक व दिलरूबा भेट मिळवला हे रसिकांना ठाऊक असेलच.

जाता जाता हेही नमूद करावसे वाटते की, 4 थ्या दशकातील उत्तरार्धात ‘मजबूर’, ‘अनोखा प्यार’, ‘गजरे’, ‘पद्मिनी’, ‘लाडली’, ‘जिद्दी’, ‘महल’, ‘अंदाज’, ‘दुलारी ‘लाहोर’, ‘एक थी लडकी’, ‘बाजार’, ‘पतंगा’, ‘बडी बहन’, ‘बरसात’ इ. अनेक चित्रपटांनी, त्यातील गाजलेल्या सर्वच गाण्यांमुळे लतांच्या पदरात अमाप यश टाकले, ज्यामुळे हिंदी चित्रपटसंगीताच्या दाही दिशा त्यांच्या आवाजाने उजळून निघाल्या व त्यांचा आवाज घरोघरी पोहोचला. थोडक्यात, त्यांच्यातील नाजुकता, मार्दव या असामान्य गुणांनी युक्त त्यांच स्वर्गीय आवाज लोकांच्या मनात कायमचा घर करून राहिला.
आधी नमूद केलेल्या ‘जीवन ज्योती’ चित्रपटाप्रमाणेच, ‘सम्राट’ (सं. हेमंतकुमार) चित्रपटातील ‘ये खामोशियाँ ये समां’, हे गीत व अमर (सं. नौशाद) चित्रपटातील ‘उदी उदी छाई घटा’ व ‘जानेवाले से मुलाकात ना होते पाई’ ही गीतेही स्वरांवर हुकूमत गाजवणार्‍या प्रतिथयश भगिनी-लता व आशांनी एकाच चालीत, एकाच पद्धतीने; पण वेगवेगळी (ध्वनिमुद्रिकांच्या स्वरूपात) गायिली होती. फरक एवढाच की, लतांची ही वर नमूद केलेली गीते चित्रपटांत समाविष्ट केली गेली होती, तर आशा भोसलेंच्या आवाजातील हीच गीते ‘व्हर्शन’ स्वरूपी होती. असो. ‘महबूबा’ (54 – सं. रोशन) व (76 – सं. राहुल देव बर्मन), ‘शर्त’ (54 – सं. हेमंतकुमार) व (69 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘कुन्दन’ (55 – सं. गुलाम महंमद) व (72 – सं. गणेश), ‘बन्दिश’ (55 – सं. हेमंतकुमार) व (80 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘लगन’ (55 – सं. हेमंतकुमार) व (71 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘सितारा’ (55 – सं. गुलाम महंमद) व (80 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘लगन’ (55 – सं. गुलाम महंमद) व (80 – सं. आर. डी. बर्मन), ‘इन्साफ’ (56 – सं. चित्रगुप्त) व (66 – सं. उषा खन्ना), ‘कारवाँ’ (56 – सं. एस. मोहिंदर) व (71 – सं. आर. डी. बर्मन), ‘देवता’ (56 – सं. सी. रामचंद्र) व (78 – सं. आर. डी. बर्मन), ‘पॉकेटमार’ (56 – सं. मदनमोहन) व (74 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘शतरंज’ (56 – सं. सी. रामचंद्र) व (69 – सं. शंकर – जयकिशन), ‘कठपुतली’ (57 – सं. शंकर – जयकिशन) व (71 – सं. कल्याणजी आनंदजी), ‘तलाश’ (57 – सं. सी. रामचंद्र) व (69 – सं. एस. डी. बर्मन), ‘नया जमाना’ (57 – सं. कानू घोष) व (71 – सं. एस. डी. बर्मन), ‘परदेसी’ (57 – सं. अनिल विश्वास) व (70 – सं. चित्रगुप्त) या चित्रपटांतील – ‘आ की अब आता नहीं दिल को करार’ (54 – ‘महबूबा’), ‘मेरे तकदीर के मालिक’ (54 – ‘शर्त’), ‘शिकायत क्या करूं दोनों तरफ’ (55 – ‘कुन्दन’), ‘तुम्हारी याद में दिल मेरा होए बेकरार है’ (55 – ‘बन्दिश’), ‘मुझे नजरसे उतार कर भी न चैन पाया’ (55 – ‘लगन’), ‘तकदीर की गर्दिश क्या कम थी’ (55 – ‘सितारा’), ‘नजर नजर से उलझ गयी रे’ (56 – ‘इन्साफ’), ‘दो नैनों का बना झूलना’ (56 – ‘देवता’), ‘तेरी गली कैसे आऊँ सजना’ (56 – ‘पॉकेटमार’), ‘हवा है सर्द सर्द’ (56 – ‘शतरंज’), ‘ना दिर दीम तन देरे ना’ (‘तराना’) (57 – ‘परदेसी’), ‘दिल है लुटा हुआ जहाँ’ (57 – ‘तलाश’) इ. सारखी लतांच्या मधाळ आवाजाने संपन्न झालेली गीते फारशी ऐकावयास मिळत नाहीत, याची खंत वाटते.

पुरस्कारांची धनी
‘पहिली मंगळागौर’, ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘राजाभाऊ’, ‘छत्रपती शिवाजी’सारख्या मराठी चित्रपटांतून अभिनयाची किमया दर्शवणार्‍या लतांनी हिंदीतील ‘बडी माँ’, ‘जीवनयात्रा’, ‘सुभद्रा’ या चित्रपटांबरोबर 1948 सालच्या ‘मंदिर’ व 1952 सालातील ‘छत्रपती शिवाजी’ (हिंदी आवृत्ती) चित्रपटांत अभिनय केला, तर 5 मराठी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय, मराठीतील ‘वादळ’, ‘कांचनगंगा’ तर हिंदीतील ‘झाँझर’ (सं. सी. रामचंद्रांबरोबर) व ‘लेकीन’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘मधुमती’, ‘बीस साल बाद’, ‘खानदान’, ‘जीने की राह’ या चित्रपटांतील गीतांसाठी फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झालेल्या या ‘मान्यवर’ पार्श्वगायिकेला – ‘परिचय’, ‘कोरा कागज’, ‘लेकीन’ या चित्रपटांतील गीतांसाठी राष्ट्रीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले.

1949 नंतर सुप्रसिद्ध संगीतकार ओ. पी. नय्यर वगळता, सर्वच संगीतकारांनी लतांच्या मनमोहक आवाजाचा ध्यास घेतला. थोडक्यात लताचा आवाज हा या सर्व संगीतकारांच्या संगीतातील एक अविभाज्य घटकच बनून राहिला (इतके की काही संगीतकारांना तर लतांचा ‘आवाज’ उणे करून फारसे यश मिळवता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.) ‘अमरदीप’ (58 – सं. सी. रामचंद्र) व (79 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘अलबेली’ (55 – सं. रवी) व (74 – सं. कल्याणजी आनंदजी), ‘परवरीश’ (58 – सं. दत्ताराम) व (77 – सं. आर. डी. बर्मन), ‘सवेरा’ (58 – सं. शैलेश मुखर्जी) व (72 – सं. आर. डी. बर्मन), ‘अनाडी’ (59 – सं. शंकर – जयकिशन) व (75 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘कंगन’ (59 – सं. चित्रगुप्त) व (72 – सं. कल्याणजी आनंदजी), ‘शरारत’ (59 – सं. शंकर – जयकिशन) व (72 – सं. गणेश), ‘बारूद’ (60 – सं. खय्याम) व (76 – सं. एस. डी. बर्मन), ‘मशाल’ (50 – सं. एस. डी. बर्मन) व (84 – सं. हृदयनाथ मंगेशकर), ‘बेजुबान’ (62 – सं. चित्रगुप्त) व (82 – सं. राम-लक्ष्मण), ‘हकीकत’ (64 – सं. मदनमोहन) व (85 – सं. भप्पी लाहिरी), ‘संत ज्ञानेश्वर’ (64 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल) व (81 – सं. श्रीकांत), ‘फरार’ (65 – सं. हेमंतकुमार) व (75 – सं. कल्याणजी आनंदजी), ‘खानदान’ (55 – सं. रवि) व (79 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल) यातील ‘जाजारे चंदा तेरी चाँदनी जलाए’ (55 – ‘अलबेली’), ‘लुटी जिंदगी और गम मुस्मुराए’ (58 – ‘परवरीश’), ‘नदिया के पानी और नदिया के पानी’ व ‘आँख् मिचौली खेल रही है’ (58 – ‘सवेरा’), ‘मुस्कुरा ओके जी नही लगता’ (59 – ‘कंगन’), ‘देखा बाळू छैडका मजा’ (59 – ‘शरारत’), ‘रंग रंगिला सांवरा मोहे मिल गयो’ (60 – ‘बारूद’), ‘आँखों से दूर दूर हैं पर दिलके पास जो’ (50 – ‘मशाल’), ‘दीवाने तुम दीवाने हम’ (62 – ‘बेजुबान’), ‘प्यार की दास्ताँ तुम सुनो तो कहे’ (65 – ‘फरार’), ‘मुझे भी मौत का पैगाम आ जाए’ (55 – ‘लुटेरा’) सारखी गीते मनाला भुरळ पाडतात…

हिंदी चित्रपटसृष्टीतील जे संगीतकार, गायक म्हणून वा जे गायक संगीतकार म्हणून नावारूपास आले, त्यामध्ये सं. सी. रामचंद्र व सं. हेमंतकुमार म्हणून नावारूपास आले, त्यामध्ये सं. सी. रामचंद्र व सं. हेमंतकुमार यांच्याव्यतिरिक्त ज्या गायक-संगीतकारांनी लतांबरोबर युगल गीतांतून आपला आवाज मिश्रित करून आपला सहभाग दर्शविला असे काही व त्यांचे चित्रपट – सं. हुस्नलाल (भगतराम) – (‘प्यार की मंजिल’), अनिल विश्वास – (‘लाजवाब’), सुधीर फडके – हिंदीतून (‘मालतीमाधव’, ‘सजनी’), दिलीप ढोलाकिया (‘सौगंध’), आर. डी. बर्मन (‘हरे राम हरे कृष्ण’, ‘एक से भले दोन’), एस. डी. बर्मन व आर. डी. बर्मन या पितापुत्रांसमवेत (‘ये गुलिस्ताँ हमारा’), भूपेन हजारिका (‘एक पल’), अन्नु मलिक (‘उस्ताद’), भप्पी लाहिरी (‘आपकी खातिर’, ‘तरकीब’, ‘दो हवालदार’, ‘सुरक्षा’, ‘जान-ए-बहार’) इ. तर सुप्रसिद्ध गीतकार आनंद बक्षींनीही लतांबरोबर – ‘मोमकी गुडिया’, ‘चरस’ या चित्रपटांसाठी गाऊन ध्वनिमुद्रिकेच्या माध्यमातून आपला आवाज रसिकांपर्यंत पोहोचविला. आपला बंधू असलेल्या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या हिंदी भाषेतील ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘चानी’, ‘चक्र’, ‘धनवान’, ‘सुबह’, ‘मशाल’, ‘रामगंगा’, ‘प्यारी भाभी’, ‘लेकिन’ इ. चित्रपटांसाठी लतांनी पार्श्वगायन केले होते, हेही या प्रसंगी विशेष नमूद करावे लागेल.

विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध पाकिस्तानी शास्त्रीय गायक सलामत अलीबरोबर लतांनी ‘अमर समाधी’ (सं. वसंत देसाई) चित्रपटात युगल गीते गायली होती. सुप्रसिद्ध पार्श्वगायक मन्नाडे व मुकेश यांच्याबरोबर अनेक चित्रपटांत एकाहून एक सुमधुर युगल गीते गाणार्‍या लतांनी मन्नाडे यांनी संगीत दिलेल्या – ‘तमाशा’, ‘नयना’, ‘चमकी’, ‘शिवकन्या’, ‘नागचंपा’ इ. चित्रपटांतून तर मुकेश यांनी स्वनिर्मित, स्वअभिनित ‘अनुराग’ चित्रपटाला संगीतही दिले होते. ज्यात लतांनी 3 सुरेल गीते गायिली होती. याशिवाय सुप्रसिद्ध शास्त्रीय सरोद वादक उ. अली अकबरखाँ यांनी संगीत दिलेल्या ‘आँधिया’, सुप्रसिद्ध तबलावादक – उ. अल्लारखाँ यांनी दिलेल्या ‘बेवफा’, सुप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांनी संगीत दिलेल्या ‘अनुराधा’, ‘गोदाम’सारख्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते.

सुरेलता…
आपल्या यशस्वी सांगितिक कारकीर्दीत सर्व भाषेत मिळून 6,500 च्या आसपास गाणी गाऊनही लतांच्या गाण्याची एकच एक अशी ठराविक पद्धती सांगता येत नसल्यामुळे त्यांचे गाणे कानांना सदैव गोड लागते. आतापर्यंत शेकडो संगीतकारांनी लतांसाठी चाली बांधल्या आहेत व त्या प्रत्येक चालीचे त्यांच्या गळ्याने सोने केले आहे. दुसर्‍याच शब्दांत सांगायचे झाले तर अगणित सर्वसामान्य श्रोत्यांना सुरेल गाणे ऐकण्याची सवय लताच्या आवाजामुळेच लागली. कारण आपल्या सुरांतून प्रसंग रंगविण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या आवाजात आहे. चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकांसाठी गाताना, त्या त्या भूमिकांच्या भावनांशी, सुख-दु:खांशी त्या चटकन समरस होतात. म्हणूनच विरह, करुण रसप्रधान गीते गातांना लता स्वत:ला पार विसरून जातात, हे त्यांची गाणी ऐकताना आपल्याला स्पष्ट जाणवते. त्यामुळेच त्यांची अशी अनेक गाणी हृदयाला भिडणारी असतात.

‘दिल्लगी’ (66 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल) व (78 – सं. राजेश रोशन), ‘ममता’ (66 – सं. रोशन) व (77 – सं. श्याम मित्रा), ‘आँखमिचौली’ (62 – सं. चित्रगुप्त) व (72 – सं. शंकर-जयकिशन), ‘अलिबाबा और 40 चोर’ (66 – सं. उषा खन्ना) व (80 – सं. आर. डी. बर्मन), ‘छलिया’ (60 – सं. कल्याणजी आनंदजी) व (73 – सं. आर. डी. बर्मन), ‘परिवार’ (56 – सं. सलील चौधरी) व (67 – सं. कल्याणजी – आनंदजी), ‘सरगम’ (50 – सं. सी. रामचंद्र) व (79 – सं. लक्ष्मीकांत – प्यारेलाल), ‘अनुराग’ (56 – सं. मुकेश) व (72 – सं. एस. डी. बर्मन), ‘नौजवान’ (51 – सं. एस. डी. बर्मन) व (66 – सं. जी. एस. कोहली), ‘लैलामजनू’ (53 – सं. गुलाम महंमद) व (76 – सं. मदनमोहन), ‘आजाद’ (55 – सं. सी. रामचंद्र) व (78 – सं. आर. डी. बर्मन), ‘भाई भाई’ (56 – सं. मदनमोहन) व (70 – सं. शंकर जयकिशन), ‘मिलन’ (58 – सं. हंसराज बहल) व (67 – सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल), ‘राज’ (67 – सं. कल्याणजी आनंदजी) व (81 – सं. रवींद्र जैन), ‘वारिस’ (69 – सं. आर. डी. बर्मन) व (88 – सं. उत्तम – जगदीश), ‘ममता’ (66) व ‘आजाद’ (55), ‘मिलन’ (60) चित्रपटांव्यतिरिक्त – ‘हाए जिया रोए’ (58 – ‘मिलन’), ‘जलेगा जहाँ चूप रहिए’ (62 – ‘आँखमिचौली’, ‘जिसने प्यार किया उसका दुश्मन जमाना’ (56 – ‘अनुराग’), ‘कोई किसीका दीवाना ना बने’ (50 – सरगम), ‘दिल का दर्द न जाने दुनिया’ (51 – ‘नौजवान’) इ. सारखी लतांची करुण रसप्रधान गीते काळजाला भिडतात. असो.

तर… ‘स्वरसम्राज्ञी’च्या 81 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने त्यांच्या सुरेल आवाजाने संपन्न झालेल्या एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या 81 चित्रपटांची ही तोंडओळख याप्रसंगी समर्पक ठरते.
गमतीचा भाग म्हणजे (केवळ रसिकांच्या माहितीसाठी), ‘एकाच नावाच्या’ तीन वेगवेगळ्या (वर्षांतील) अशा 9 (मिळून एकूण 27), चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणार्‍या त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुधा ‘एकमेव’ पार्श्वगायिका ठरतील ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे.

अलौकिकत्व
लताचे गायन हे त्यांच्या अविरत साधनेचे फळ आहे. त्या एक निसर्गदत्त कलाकार आहेत, ज्यांच्या सुरात कुठेच कधी कृत्रिमता जाणवत नाही.
अशी एकही मोठी किंवा लहान अभिनेत्री नाही की जिला लतांनी आवाज दिला नसावा.
अलौकिक गोड गळा ही त्यांना ईश्वराने दिलेली, जन्मदात्याकडून वारसाने मिळालेली देणगी असली तरी त्या गळ्यातून निघणार्‍या गाण्यांसाठी त्यांनी केलेली मेहनत, त्यावर केलेले जाणीवपूर्वक संस्कार व त्यामुळे त्याला आलेला कसदारपणा हे निश्चितच त्यांचे स्वत:चे कर्तृत्व आहे.
सर्वसामान्य संगीतप्रेमींनी जवळ केलेल्या नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन, रोशन, मदन मोहन, अनिल विश्वास, सलील चौधरी इ. संगीतकारांनी स्वररचनेचे फार कौतुकास्पद चातुर्य दाखवले आहे व त्यांच्या संगीतात, लतांच्या आवाजाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. या सर्व संगीतकारांनी खर्‍या अर्थाने लतांच्या धारदार, मुलायम आवाजाला घडवून आकार दिला व त्या बदल्यात लतांनीही त्या संगीतकारांच्या संगीताला एका वेगळ्याच उंचीला नेऊन ठेवले व त्यांचे अस्तित्व अधिक मजबूत केले. लतांचा हृदयस्पर्शीआवाज आधीच्या खड्या आवाजातील इतर गायिकांच्या आवाजांना मागे टाकून कायमचा पुढे जातच राहिला. थोडक्यात, आधीच्या गायिकांचा गोडवा लतांच्या आवाजातही, त्या सर्व संगीतकारांच्या संगीतात कायम राहिला.
त्यांच्या हिंदीतील सांगितीक कारकीर्दीचा विचार करत असताना मला जाणवले की, 1949 सालातील ‘बरसात’ चित्रपटाने त्या काळात नवा विक्रम प्रस्थापित केला. या चित्रपटामुळे पहिल्यांदाच चित्रपटातील दोन नायिकांसाठी (निम्मी व नर्गिस) व सहनायिका (विमलाराणी) साठीही फक्त लतांच्या आवाजाचाच सुरेख वापर केला गेला. असो. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात लतांचा स्वर ढळला आहे, अशी एकही ध्वनिमुद्रिका आढळणार नाही. या काळात त्यांचे गाणे कधीही बेसूर झाले नाही.

लतांविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर एका सर्वोत्कृष्ट गायिकेजवळ जे सर्व गुण असायला हवेत ते सर्वच त्यांच्यात आहेत, ज्यातून त्यांचे ‘अलौकिकत्व’ सिद्ध होते. 

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Dr Prakash Kamat, Pune
+ posts

Leave a comment