-अजिंक्य उजळंबकर

त्यांनी ‘सरदार’ वल्लभभाई पटेल साकारले आहेत. त्यांनी ‘सर’ मध्ये खलनायक वेलजी साकारलाय. इन्स्पेक्टर साहू म्हणून ते ‘मोहरा’ मध्ये होते. ‘ओह माय गॉड’ म्हणत कांजी भाई मेहता साकारलाय. ‘संजू’ मध्ये सुनील दत्त साकारले आहेत. ‘अंदाज अपना अपना’ मध्ये ‘मार्क इधर है मै तेजा हूँ’ तेच म्हणायचे. ‘आँखें’ मधील दृष्टी गेलेला इलियास त्यांचाच होता. आणि ‘हेरा फेरी’ करणारा मराठी माणूस बाबुराव गणपतराव आपटे याला अजरामर करणारे पण तेच आहेत. ते आहेत आजचे बर्थडे बॉय परेश रावल सर. ( Paresh Rawal Birthday Special)

खरोखर सरच … नव्हे तर अभिनयाचे हेडमास्तर. केवळ हेडमास्तर नव्हे तर अभिनयाचे धडे घेणाऱ्या आजच्या पिढीसाठी तर ते एक विद्यापीठ आहेत. चालते बोलते विद्यापीठ.  ‘अष्टपैलू’ व ‘प्रतिभावान’ या दोन शब्दांना अक्षरशः जगणारा हिंदी सिनेसृष्टीतला मनस्वी कलाकार. वर उल्लेख केलेले तर केवळ काही महत्वाचे रोल आहेत. परेश रावल यांनी साकारलेल्या सर्व भूमिकांवर लिहायला शब्द व बोलायला वेळ कमी पडेल अशी परिस्थिती आहे.

परेश सर गुजराती असले तरी मूळचे मुंबईचेच. गुजराती नाटकांमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. १९८४ साली केतन मेहता यांच्या ‘होली’ मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला खरा पण ‘अर्जुन’ (१९८५) या तिसऱ्या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची पहिल्यांदा नोंद घेण्यात आली. यादरम्यान दूरदर्शनवर चुनौती, बनते बिघडते या मालिकांमधून कामे केली. त्यानंतर नाम, शिवा, तमन्ना, नायक, हंगामा, गोलमाल, भूल भुलैय्या, वेलकम, अतिथी तुम कब जाओगे या सिनेमांमधील परेश सरांनी रंगविलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. ‘ओय लकी लकी ओय’ मध्ये साकारलेल्या तीन भूमिका तर अफलातून होत्या.

परेश सर आजच्या घडीला बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एकमेव असे नाव आहे ज्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका जगल्या आहेत मग ते सहाय्यक अभिनेता असो कि खलनायक, चरित्र अभिनेता असो कि विनोदी अभिनेता.हिंदी सोबतच अनेक तेलगू चित्रपटातूनही त्यांनी काम केलंय व तिथेही मैदान गाजवले आहे. विशेषकरून ८० च्या दशकात ‘महेश भट्ट’ व ९०-२००० च्या दशकात प्रियदर्शन या दोन दिग्दर्शकांबरोबर त्यांच्या जमलेल्या ट्युनिंगमुळे परेश रावल यांच्यातला प्रतिभा संपन्न कलाकार प्रेक्षकांना बघावयास मिळाला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारात दोन राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर व इतर मिळालेले पुरस्कार/नामांकन यांची संख्या ३४ आहे. २०१४ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ ने गौरविण्यात आले.

अभिनेत्री स्वरूप संपत सोबत १९७९ साली त्यांचा विवाह झाला. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. परेशजी २०१४ मध्ये अहमदाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून येत खासदार झाले. आज वयाच्या ६६  व्या वर्षी तितकेच फ्रेश व तरुण वाटणाऱ्या परेशजींच्या खात्यात तब्बल २३५ सिनेमांमधून केलेल्या एकापेक्षा एक भूमिका जमा आहेत. पण ना परेशजींची भूक मिटली आहे ना माझ्यासारख्या त्यांच्या असंख्य कट्टर फॅन्सची.

परेशजी आपणास ईश्वर उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हॅप्पी बर्थडे परेश सर!

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.