१९८० च्या दशकात जेंव्हा एकीकडे अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर, प्रेम चोप्रा, गुलशन ग्रोव्हर इत्यादी नावे हिंदी सिनेमाच्या खलनायकी विश्वात गाजत होती व अग्रेसर होती त्याच वेळी एक नाव असेही होते ज्याचा दमदार आवाज, हिंदी व उर्दू भाषेवरील प्रभुत्व व प्रभावी अभिनय यामुळे चर्चेत होते…ते म्हणजे ‘रझा मुराद’. (Actor Raza Murad Birthday) आज त्यांचा जन्मदिन.

 

प्रख्यात चरित्र अभिनेते मुराद यांचा मुलगा म्हणजे रझा मुराद. मग काय? दमदार आवाजाची देणगी जणू वडिलांकडूनच रझा यांना मिळाली असे म्हणावे लागेल. सोबत अभिनयाचीही.  सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जेंव्हा रझा यांनी सिनेमा इंडस्ट्रीत नशीब आजमावयास सुरुवात केली तेंव्हा त्यांची पहिली लक्षवेधी भूमिका होती १९७३ सालच्या ‘नमक हराम’ या चित्रपटातील. ह्रिषीकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा गाजला अमिताभ बच्चन व राजेश खन्ना या दोन सुपरस्टार्सच्या जुगलबंदीने. त्यात रझा एका दारुड्या शायर आलम च्या भूमिकेत दिसले. योगायोग असा कि आजच्याच दिवशी म्हणजे रझा यांच्या वाढदिवशी नमक हराम प्रदर्शित झाला होता. त्याआधी रझा यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचे धडे घेतले होते व डिप्लोमा कोर्स पूर्ण केला होता. १९७३ ते १९८२ या वर्षांमध्ये रझा यांनी लहान सहान बऱ्याच चित्रपटांमधून भूमिका केल्या. त्यांची पहिली लक्षवेधी भूमिका ठरली ती म्हणजे राज कपूर यांच्या प्रेम रोग चित्रपटातील. त्यात त्यांनी रंगविलेला खलनायक राजा वीरेंद्र प्रताप सिंग प्रेक्षकांना जाम आवडला व यानंतर रझा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

 

खुद्दार, राम-लखन, त्रिदेव, राम ‘तेरी गंगा मैली, प्यार का मंदिर, मोहरा, इज्जत, हिना, गुप्त, आँखें इत्यादी काही चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. १९९० च्या दशकात रझा मुराद हे हिंदी सिनेमाच्या प्रमुख खलनायकांपैकी एक होते. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे, उर्दूवरील प्रभुत्वामुळे व प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्यांना टेलिव्हिजन सिरियल्स व चित्रपटांमधून शाहजहाँ, जहांगीर अशा ऐतिहासिक पात्रांना साकारण्याची संधी मिळाली. त्यात अगदी अलीकडच्या काळात आलेले जोधा अकबर, बाजीराव मस्तानी व पद्मावत या चित्रपटांचाही समावेश आहे. हिंदी सोबतच पंजाबी व तेलगू चित्रपटांमध्येही त्यांनी बरेच काम केले आहे. पीटीसी पंजाबी फिल्म अवॉर्ड्स ने त्यांचा लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान केला आहे.


अभिनेत्री झीनत अमान ही रझा यांची चुलत बहीण असून अभिनेत्री सोनम ही त्यांची पुतणी आहे. आता मुराद घराण्याची तिसरी पिढीसुद्धा अभिनय क्षेत्रात आली आहे. यावर्षी रझा साहेबांचा मुलगा अली मुराद याने ‘धीट पतंगे’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले आहे.  आज रझा वयाची ७० वर्षे पूर्ण करीत आहेत व आजही ते कार्यरत आहेत. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नवरंग रुपेरी परिवारातर्फे त्यांना असंख्य शुभेच्छा.

– टीम नवरंग रुपेरी

Editor
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.