– डॉ. राजू पाटोदकर

सिनेसृष्टीमध्ये सदाबहार अभिनेता म्हणून देव आनंद ओळखले जातात. त्यांच्या नंतर ही उपाधी कोणाला द्यायची असे ठरले तर ती नक्कीच अनिल कपूर यांना मिळू शकते म्हणूनच सदाबहार अभिनेताअनिल कपूर असे म्हटले आहे. आज २४ डिसेंबर हा अनिल कपूर यांचा जन्मदिवस. सर्वप्रथम अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Happy Birthday Anil ji!!!

माझ्या सिने पत्रकारितेचे काळात मी अनिल कपूर यांना भेटलो आहे, त्यांची मुलाखत घेतली होती. फिल्मसिटीमध्ये त्यावेळी अशोक ठाकरिया ( पुनम ढिल्लोंचे पती ) व इंद्रकुमार इराणी ( अरुणा इराणी चे भाऊ ) यांच्या मारुती इंटरनॅशनलचा ‘कसम’ हा चित्रपट तयार होत होता. फिल्म सिटी मध्ये याचा मोठा सेट त्यावेळी उभारण्यात आला होता. पूनम ढिल्लों, प्राण, जॉनी लिव्हर, कादर खान अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या सेटवर त्यांची माझी भेट झाली, मुलाखत घेतली.(१२/२/१९८७) त्यावेळी अनिल कपूर हे मला एक वेगळाच भारदस्त व्यक्तिमत्त्व वाटले. एकूणच त्यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला, तर हे लक्षात येऊ शकते की वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी चित्रपटातून केल्या आहेत. प्रेक्षकांनी देखील त्या मोठ्या आवडीने स्वीकारल्या. सिनेरसिकांची च्या आवडीचा अभिनेता म्हणून अनिल कपूर हे नाव सिद्ध झालेल्या प्रसंगी हिरोची मध्यवर्ती भूमिका तसेच दोन-तीन हिरो असलेले चित्रपट देखील त्यांनी केले.

 

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर यांचा पुत्र, बोनी कपूर चा भाऊ, अशी सुरुवातीच्या काळातील त्यांची ओळख. जन्म २४ डिसेंबर १९५६. सुरुवातीचा काही काळ अडखळत प्रवास. अतिशय नगण्य छोट्या-मोठ्या भूमिका पण त्यानंतर १९८६ ला ‘वो सात दिन’ हा पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबतच्या चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते के बापू. यांच्यासोबत अनिल कपूर यांनी तेलगू (Vamsa Vruksham) चित्रपट केला होता. सुरुवातीला एक  हिंदी चित्रपट (१९७९) हमारे तुम्हारे  (१९८१) हम पांच आणि त्यानंतर मनीरत्नम् यांचा कन्नड चित्रपट (Pallavi Anu Pallavi) देखील चित्रपट अनिल यांनी केला. पण त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीच जास्त भावली. १९८४ ला यश चोप्रा यांच्या ‘मशाल’ चित्रपटाद्वारे आपली दमदार एन्ट्री केली. दिलीप कुमार, वहिदा रहेमान, सईद जाफरी, रती अग्निहोत्री, अमरीश पुरी, निळूभाऊ फुले अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटाची होती. नंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. युद्ध, साहेब, चमेली की शादी, कर्मा, जाँबाज, (१९८७)  मि.इंडिया, (१९९०) किशन कन्हैया, बुलंदी, रूप की रानी चोरो का राजा, दिवाना मस्ताना, बीबी नंबर 1 अशा हिट चित्रपटांची मालिकाच पुढे केली.

 

Eeshwar movie poster
Eeshwar-Image Courtesy-IMDb

एकदम झकास

एकदम झकास असे विशिष्ट लकबीत बोलून अनिल जी ने आपलं अभिनयाचे नाणे खणखणीत आहे हे सिद्ध केलं. भूमिका कोणत्याही प्रकारची असो टपोरी, विनोदी, गंभीर तिला आपल्या शैलीत साकारून हिट करण्याचा तंत्र त्यांना जमलं. अर्थातच जोडीला सहकलाकार, दिग्दर्शक यांची साथ होतीच. १९८९ या वर्षी प्रदर्शित झालेल्या ईश्वर या चित्रपटातून भोळ्याभाबड्या युवकाची अतिशय सुरेख भूमिका त्यांनी साकारली. सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री विजयाशांती होती. हा चित्रपट मला व्यक्तिशः खुप आवडला. अर्थातच अनिल कपूर यांचे काम भावले. गेल्या काही वर्षांपूर्वीचा नायक हा चित्रपट देखील चांगला गाजला. पुढे काळाची सावन घेत अनिल यांनी दुय्यम भूमिका केल्या. त्याही प्रेक्षकांनी स्वीकारल्या. वेलकम, वेलकम अगेन, टोटल धमाल, शूटआऊट ऍट वडाला, तेज असे बरेच चित्रपट आहेत.

anil kapoor with jackie shroff
Anil Kapoor with Jackie Shroff-Image Courtesy Pinkvilla

जॅकी सोबत सुपरहिट जोडी

जॅकी श्रॉफ अनिल कपूर यांची जोडी रसिकांना खूपच भावली. जॅकी मोठा  तर अनिल छोटा भाऊ. असली कॉम्बिनेशन आपणास पहावयास मिळाले. काही चित्रपटात त्यांनी मित्राचे ही काम केले आहे. या दोघांच्या कामाचे रसायन खूप छान जमल्याने प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतले. राम लखन, परिंदा, कालाबाजार, युद्ध, कर्मा, अंदर बाहर, 1942 अ लव्हस्टोरी, रूप की रानी चोरो का राजा,  कभी ना कभी, त्रिमूर्ती,नक्षा, लज्जा असे बरेच चित्रपट या जोडीचे आहेत.

 

Anil Kapoor with Madhuri Dixit
 
माधुरी आणि श्रीदेवी

जॅकी श्रॉफ यांच्यासारखेच माधुरी दीक्षित सोबतचे चित्रपटही प्रेक्षकांनी जोरदार स्वीकारले. तेजाब, लज्जा, टोटल धमाल, जीवन एक संघर्ष हिफाजत ( या चित्रपटातील बटाटावडा प्यार नही करना था.. करना पडा. या गाण्याची शूटिंग कव्हरेज मी केलेले आहे. ) अशी जवळपास १८ पिक्चर दोघांनी एकत्र केले आहेत. मी माधुरी सोबत काम करताना एकदम कम्फर्ट असतो. २००१ मध्ये माधुरी चे जेव्हा पुनरागमन झाले त्यावेळेस लज्जा हा चित्रपट केला. माधुरी जराही बदलली नव्हती, असे अनिल कपूर यांनी त्यावेळी म्हटले. माधुरी प्रमाणेच अनिल कपूर यांची जोडी श्रीदेवी सोबतही खुप जमली. प्रेक्षकांनीही या जोडीला डोक्यावर घेतले आपणास त्यांचा सुपरहिट चित्रपट मि. इंडिया आठवत असेल. तसेच या जोडीचे लम्हे, जुदाई हे  चित्रपट आपण अनुभवले आहेत. जुही चावला, करिष्मा कपूर, विजयाशांती, राणी मुखर्जी, रती अग्निहोत्री यांच्यासोबत देखील
अनिलजींचे ट्युनिंग खूप छान जमले.

Anil Kapoor with Sridevi

 

अवॉर्डस्

दोन वेळेस नॅशनल अवॉर्ड आणि सहा वेळेस फिल्मफेअर पुरस्कार याखेरीज बरेच अनिल कपूर यांना मिळाले आहेत. मशाल या चित्रपटातील भूमिकेबद्दल बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर चा फिल्मफेअर तर तेजाब मधील भूमिकेबद्दल बेस्ट ऍक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.२००० मध्ये पुकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये(२०१३) त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला असा सन्मान होणारे ते पहिले भारतीय अभिनेता आहेत.
स्लमडॉग मिलेनियर, अनिल कपूर आणि ऑस्कर ॲवार्ड भारतीय सिनेरसिक कधीही विसरू शकणार नाहीत. निर्माते अनिल कपूर २००२ मध्ये बधाई हो बधाई या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर यांनी सतीश कौशिक यांच्यासमवेत केली. त्यानंतर माय वाईफ मर्डर, गांधी, माय फादर गांधी, शॉर्टकट हे चित्रपट त्यांनी निर्माण केले. आपली कन्या सोनम कपूर साठी आयशा हा चित्रपट देखील त्यांनी निर्माण केला.त्यासोबत काही टीव्ही शो ची निर्मिती देखील आहे.

अनिल कपूर यांची गाजलेली गाणी

१) माय नेम इज लखन – राम लखन
२) एक-दोन-तीन-चार  – तेजाब
३) कह दो कि तुम हो मेरी वरना- तेजाब
४) जिंदगी हर कदम एक नई जंग है- मेरी जंग
५) कोयल सी तेरी बोली- बेटा
६) आगे सुख तो पिछे दुख है – ईश्वर
७) एक लडकी को देखा तो ऐसा लगा- 1942 ए लव्ह स्टोरी
८) कसम क्या होती है -कसम
९) तेरा साथ है कितना प्यारा – जाँबाज
१०) यार बिना चैन कहा रे – साहेब.
————————————–

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment