‘दुर्गामती – द मिथ’ या आगामी चित्रपटातील भूमी पेडणेकर आणि करण कपाडिया यांच्यावर चित्रित झालेले रोमँटिक गाणे ‘बरस बरस’ आज रिलीज झाले. हे गाणे म्हणजे भूमी आणि करणच्या सिनेमातील रोमान्सचे प्रतिबिंब आहे. दोघांचा सोबत हा पहिलाच सिनेमा आहे. तनिष्क बागची लिखित व संगीत दिग्दर्शित केलेले हे गाणे बी प्राक यांनी गायले आहे. दोघेही आजच्या घडीला संगीत जगतातील प्रसिद्ध तारे आहेत. यापूर्वी बी प्राक ने  अनेक हिट गाण्यांद्वारा आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे तर तनिष्क ने आपल्या असंख्य ट्यून्सवर रसिकांना नाचण्यास भाग पाडले आहे. या गाण्यास अल्तमश फरीदी ने सुद्धा आपला आवाज दिला आहे. 

अशोक जी दिग्दर्शित, अक्षय कुमार (केप ऑफ गुड फिल्म्स), भूषण कुमार, टी-सीरिज, कृष्णा कुमार, विक्रम मल्होत्रा निर्मित ‘दुर्गामती’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर  ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

पहा पूर्ण गाणे इथे — 

 

Website | + posts

Leave a comment