आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूड अभिनेता ताहिर राज भसीन (Actor Tahir Raj Bhasin) आपल्या आगामी ‘लूप लपेटा’ (Looop Lapeta film) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यास उत्साहीत आहे. या अनोख्या अशा रोमँटिक कॉमेडीमध्ये त्याने तापसी पन्नूबरोबर काम केले असून निश्चितच या जोडीत रसिकांना सुपर फ्रेश केमिस्ट्री दिसेल. (actor taahir raj bhasin talks about his role in the film loop lapeta)

तापसी पन्नू सोबत आपल्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार्‍या ताहिर राज भसीन यांनी याबद्दल मोकळा संवाद साधत सांगितले: “मी सर्वप्रथम तापसीसोबत सेटवर परत येण्याच्या अनुभवाबद्दल बोललो.” 

कोरोना साथीच्या आजारा दरम्यान पुन्हा शूटिंग सुरू करण्याबाबत ताहिर म्हणतो, “मी चित्रपटाच्या सेटवर परत आल्याचा मला आनंद झाला आहे. रोल, साउंड, कैमरा आणि एक्शन हे शब्द ऐकण्यासारखा दुसरा आनंद नाही. यादरम्यान व्हॉट्स अप व झूम द्वारे आम्हाला जे शिकायला मिळाले त्याचे निश्चितच फायदे आहेत परंतु आमच्या क्रू मेंबर्स आणि सर्व सह-कलाकारांना भेटणे आणि समोरासमोर बोलणे याची कशाशी तुलना होणे शक्य नाही.”
‘लूप लपेटा’ च्या सेटवर पहिल्याच दिवसापासून कास्ट आणि क्रूमधील सर्व सदस्य पूर्ण उत्साहात  असल्याचे ताहिरने यावेळी सांगितले. तो म्हणतो की, “लूप लपेटाच्या पहिल्या दिवशी आमच्या सर्वांना थोडा त्रास झाला होता, तरीही आम्ही खूप उत्सुक होतो. आम्ही सर्व पूर्णपणे तयार होतो आणि शूटिंगमध्ये आम्ही खूप मजा घेत होतो. ‘लूप लपेटा’ सेटचे वातावरण जोमाने आणि उर्जेने भरलेले होते तापसीने आपल्या जबरदस्त ऊर्जेने त्या वातावरणात अजूनच उत्साह निर्माण केला; कारण प्रत्येकाला सोबत घेण्याच्या बाबतीत तिची ऊर्जा अविश्वसनीय आहे. निर्माते, तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर यांनी आम्हा सर्वाना अगदी घरच्यासारख्या वातावरणात ठेवले आहे. आमचे नवोदित दिग्दर्शक आकाश भाटिया खूप उत्साही व्यक्ती आहेत. या चित्रपटात काम करणे ही खरोखर मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या कल्पकतेमुळेच आम्ही सर्वजण गेल्या काही महिन्यांपासून एक टीम म्हणून एकत्र काम करत आहोत.”

तापसी आणि ताहिर प्रथमच एकत्र काम करत आहेत. दोघेही सेटवर किती मिळून मिसळून काम करत आहेत व अभिनयाच्या बारकावे कसे शेअर करत आहेत याबद्दल ताहीर याने यावेळी सांगितले. 

तो म्हणतो, “या सिनेमातील माझे पात्र व हा सिनेमा मला अगदी जवळचा वाटतो. मी सर्वप्रथम तापसीला हेच विचारले की, लॉकडाऊन दरम्यान घरी बसल्यानंतर सेटवर परत आल्यावर तिला कसे वाटते? तसेच आपल्यातील कामाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत याबद्दलही आम्ही बोललो. तसेच, आमच्या बर्‍याच चर्चा दररोजच्या दृश्याबद्दल असतात. त्याला अजून कसे चांगल्या रित्या सादर करता येईल याबद्दलही आम्ही बोलत असतो. न्यू-नॉर्मल मध्ये आम्ही सर्व मास्क वापरत आहोत व सोशल डिस्टेंसिंग पाळत आहोत. आमचे सर्व टीम सदस्य सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेता आहेत.”

प्रेक्षकांना तापसी आणि त्याची जोडी आवडेल का याबाबत ताहिर म्हणतो, “तापसीसारख्या को-स्टारबरोबर काम करण्यासारखी दुसरी चांगली गोष्ट कोणती असू शकत नाही. आमची नवीन फ्रेश जोडी व अभिनय प्रेक्षकांना नक्की आवडेल, याचे  मोठे कारण म्हणजे चित्रपटातील आमची  पात्रं खूप विचारपूर्वक लिहिली गेली आहेत. याक्षणी, आम्ही आमच्या दोघांमधील केमिस्ट्री चांगली करण्याचा प्रयत्न करीत आहोत जी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल आणि हेच सर्वात कठीण काम आहे.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.