मनीषा कोईराला व “१९४२-ए लव्ह स्टोरी” 

९० च्या दशकात श्रीदेवी नंतर, नायिकांच्या सुपरस्टार पदावर आसनस्थ झालेल्या माधुरी दीक्षित ला आवाहन देणारी अभिनेत्री म्हणून जिच्याकडे बघितले गेले अशी प्रतिभासंपन्न मनीषा कोईराला. आज मनीषाचा वाढदिवस. माधुरीप्रमाणे तिचे करिअर बहरले नाही पण सौंदर्य व प्रतिभेचा उत्कृष्ट मिलाफ माधुरीनंतर मनीषात दिसला होता हेही तितकेच खरे.
सौदागर या शोमॅन सुभाष घईंच्या चित्रपटातून इलू इलू म्हणत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मनीषाला खऱ्या अर्थाने ब्रेक दिला तो “१९४२-ए लव्ह स्टोरी” या चित्रपटाने. मनीषाचं साधं व सुंदर रूप जे या चित्रपटात दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा ने दाखवलं ते परत कुठल्याच चित्रपटात तसं दिसलं नाही. ‘रज्जो’ या भूमिकेत मनिषाने आपल्या मोहक सौंदर्यासोबतच कमालीच्या प्रभावी अभिनयाने जान ओतली होती. त्यात भर घातली होती आर.डी. बर्मन यांच्या कर्णमधुर संगीताने. म्हणजे सोने पे सुहागा.
पण १९४२ साठी विधू विनोद यांची फर्स्ट चॉईस माधुरी होती. ‘परिंदा’ मुळे चोप्रा व माधुरी यांची वेव्हलेन्थ जुळलेली होती शिवाय अनिल-माधुरी ही जोडी म्हणजे सुपरहिट असे समीकरण जमलेले होते. या चित्रपटासाठी जेंव्हा मनिषाने पहिली स्क्रीन टेस्ट दिली तेंव्हा चोप्रांनी मनीषाला “Terrible Actress” असे म्हणून रिजेक्ट केले होते. पण मनिषा मागे हटली नाही. तिने तयारी करून पुन्हा दुसरी स्क्रीन टेस्ट दिली. यावेळी चोप्रांना त्यांची रज्जो मनिषात सापडली व माधुरीची जागा मनिषाने घेतली.
स्वातंत्र्यपूर्व काळातील, स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी रज्जो. साधी, सरळ व अल्लड. दोन वेण्या घालणाऱ्या, चेहऱ्यावर निरागस स्मितहास्य असलेल्या, साध्या सलवार-कमीज अथवा साडी या वेशामधील, कुठल्याही बटबटीत मेकअप व दाग-दागिन्यांशिवाय दिसलेल्या मनीषाच्या मोहक सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” या गाण्यात केलेले नायिकेचे वर्णन मनीषावर अगदी फिट्ट बसले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही पण अभिनेत्री म्हणून मनीषा कोईराला हिचा जन्म झाला. प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी पण मनीषाच्या अभिनयाचे कौतुक केले व मनीषाला तिच्या करिअरमधील पहिल्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. पुढे अनेक अविस्मरणीय भूमिका मनिषाने वठविल्या पण रज्जोला मात्र आज २६ वर्षांनंतरही प्रेक्षक विसरलेले नाहीत.
– टीम नवरंग रुपेरी
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.